10 Banana Producing Countries : भारताने कृषी उत्पादनात पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. जगभरात केळीच्या उत्पादनात भारत हा पहिल्या क्रमांकाचा देश ठरला असून, जागतिक उत्पादनापैकी तब्बल २५ ते २६ टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. २०२४ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताचे केळी उत्पादन चीनच्या तुलनेत तिप्पट असून महाराष्ट्राने देशात आपले वर्चस्व कायम राखले आहे.
जागतिक क्रमवारीत भारताचा 'एक्का'
- केळी उत्पादनाच्या जागतिक यादीत भारताने चीनला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.
- भारत : ३६.६ दशलक्ष टन उत्पादनासह जगात प्रथम.
- चीन : ११.७ दशलक्ष टनांसह दुसऱ्या क्रमांकावर.
- आशियाचे वर्चस्व : भारत, चीन आणि इंडोनेशिया हे तीन आशियाई देश मिळून जगातील एकूण उत्पादनापैकी ६० टक्के केळी पिकवतात. यामुळे जागतिक 'सप्लाय चेन'मध्ये आशियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
जागतिक स्तरावरील 'टॉप ५' केळी उत्पादक देश
| देश | उत्पादन (दशलक्ष टनात) |
| भारत | ३६.६ |
| चीन | ११.७ |
| इंडोनेशिया | ९.३ |
| नायजेरिया | ७.३ |
| इक्वेडोर | ७.२ |
देशात महाराष्ट्र पुन्हा 'अव्वल'!
- केवळ जागतिक स्तरावरच नव्हे, तर देशांतर्गत उत्पादनातही महाराष्ट्राने आपली आघाडी कायम ठेवली आहे. जळगावसह खान्देशातील केळीने देशाला मोठे योगदान दिले आहे.
- महाराष्ट्र : १७.३७ टक्के वाट्यासह देशात प्रथम क्रमांकावर (६,५३४.३५ हजार मे. टन).
- आंध्र प्रदेश : १५.५ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी.
- तामिळनाडू : १२.५५ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर.
भारतीय राज्यांची स्थिती (हजार मे. टन):१. महाराष्ट्र (६,५३४)२. आंध्र प्रदेश (५,८३०)३. तामिळनाडू (४,७१९)४. उत्तर प्रदेश (४,१९१)५. गुजरात (४,०१०)
वाचा - आता अमेरिकेतून येणार स्वस्त सोने-चांदी! व्यापार कराराचा मोठा फायदा; देशांतर्गत किमती घटणार?
केळी केवळ फळ नव्हे, तर उद्योगाचा आधारकेळीचा वापर केवळ खाण्यासाठीच होत नाही, तर त्यापासून चिप्स, प्युरी आणि जॅम बनवणारे उद्योगही मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असून निर्यातीतून परकीय चलन मिळवण्याची मोठी संधी भारताकडे आहे.
Web Summary : India leads global banana production, exceeding China's output threefold. Maharashtra dominates domestically. India accounts for 25-26% of global production. Top 5 producers: India, China, Indonesia, Nigeria, and Ecuador. Banana-based industries boost rural economies.
Web Summary : भारत वैश्विक केला उत्पादन में अग्रणी है, चीन से तीन गुना अधिक उत्पादन। महाराष्ट्र घरेलू स्तर पर हावी है। वैश्विक उत्पादन का 25-26% भारत का है। शीर्ष 5 उत्पादक: भारत, चीन, इंडोनेशिया, नाइजीरिया और इक्वाडोर। केले आधारित उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थाओं को बढ़ावा देते हैं।