Free Trade Agreement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या इस्राईल दौऱ्याने दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांना एक नवी दिशा दिली आहे. भारत आणि इस्राईल आता 'मुक्त व्यापार करारा'वर गांभीर्याने विचार करत असून, या संदर्भातील वाटाघाटींची पहिली फेरी पुढच्या आठवड्यात मंगळवारपासून सुरू होणार आहे. व्यापार, नवसंशोधन आणि विकास या त्रिसूत्रीवर ही चर्चा आधारित असेल.
नेमका काय असतो 'फ्री ट्रेड ॲग्रीमेंट'?जेव्हा दोन देश एकमेकांसोबत वस्तूंची आयात आणि निर्यात करतात, तेव्हा त्यावर काही सरकारी कर (टॅरिफ) लावले जातात. मात्र, 'मुक्त व्यापार करार' झाला की दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापारावर अतिशय कमी किंवा शून्य टक्के कर लावला जातो. आयात-निर्यातीमधील कायदेशीर अडथळे कमी होतात, ज्यामुळे मालाची ने-आण जलद गतीने होते.
सामान्य माणसाला काय होणार फायदा?फ्री ट्रेड डीलचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. जर भारतीय व्यापाऱ्यांना इस्राईलकडून येणारा कच्चा माल किंवा तयार वस्तू कमी करात मिळाल्या, तर त्या वस्तूंची बाजारातील किंमतही कमी होईल. यामुळे महागाई कमी होण्यास मदत होते आणि दर्जेदार जागतिक उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध होतात.
वाचा - अफगाण-पाक युद्धामुळे भारतीय गुंतवणुकीला धोका! २७ हजार कोटींच्या प्रकल्पांवर टांगती तलवार
कोणत्या वस्तू होणार स्वस्त?
- भारत आणि इस्राईलमधील हा करार पूर्णत्वास आल्यास खालील वस्तूंच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता आहे.
- मौल्यवान हिरे आणि खडे: इस्राईलची हिरे उद्योगात मोठी पकड आहे, ज्यामुळे दागिन्यांच्या किमतीत फरक पडू शकतो.
- खते आणि रसायने: शेतीसाठी आवश्यक असलेली खते आणि खनिज उत्पादने स्वस्त होतील.
- मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स: प्रगत इस्त्रायली तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने कमी दरात उपलब्ध होतील.
- डिफेंस प्रॉडक्ट्स: संरक्षण क्षेत्रातील उपकरणांच्या किमतीत बचत होईल.
- पेट्रोलियम तेल आणि वाहतूक उपकरणे: इंधन आणि वाहन क्षेत्राशी संबंधित सुट्या भागांच्या दरात घट होऊ शकते.
Web Summary : India and Israel are considering a free trade agreement, potentially lowering prices on diamonds, fertilizers, machinery, electronics, defense products, and petroleum-related items. Talks begin next week, focusing on trade, innovation, and development, benefiting consumers through reduced costs.
Web Summary : भारत और इज़राइल मुक्त व्यापार समझौते पर विचार कर रहे हैं, जिससे हीरे, उर्वरक, मशीनरी, इलेक्ट्रॉनिक्स, रक्षा उत्पादों और पेट्रोलियम संबंधित वस्तुओं की कीमतें कम हो सकती हैं। अगले सप्ताह वार्ता शुरू होगी, जो व्यापार, नवाचार और विकास पर केंद्रित होगी, जिससे उपभोक्ताओं को लाभ होगा।