Join us

Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:03 IST

Crude Oil Reserves India : अंदमानमध्ये २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचे भांडार मिळाले आहे. यामुळे आता भारताला कच्चे तेलासाठी दुसऱ्या देशाकडे जावे लागणार नाही.

भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताला अंदमानच्या समुद्रात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचे भांडार सापडले आहे. याबाबतची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह यांनी दिली. हरदीप सिंह पुरी म्हणाले की, जर हा अंदाज बरोबर निघाला तर भारताचा जीडीपी ५ पट वाढू शकतो. 

"अंदमान समुद्रात कच्च्या तेलाचा साठा सापडला आहे. सरकारने तो काढण्याची तयारी सुरु केली आहे. हा साठा सापडल्यानंतर आपल्या ऊर्जेच्या गरजा एकाच वेळी पूर्ण होतील, असे मानले जाते", असंही हरदीप सिंह पुरी म्हणाले. 

डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...

हरदीप सिंह पुरी म्हणाले,हा पेट्रोलियम साठा गयानामध्ये काही दिवसापूर्वी सापडलेल्या कच्च्या तेलाच्या साठ्याइतका (११.६ अब्ज बॅरल) असू शकतो. जर हा अंदाज शोध आणि संशोधनात बरोबर ठरला, तर भारताचा जीडीपी एकाच वेळी ३.७ ट्रिलियन डॉलर्सवरून २० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकतो.

कंपन्यांनी ड्रिलिंगचे काम सुरु केले

"आता अंदमान आणि निकोबार द्विप समुहमध्ये कच्चे तेल काढण्याचे काम सुरू आहे. ओएनजीसी या कंपनीने सर्वेक्षण आणि ड्रलिंगचे काम सुरू केले आहे. 

ONGC २०२४ मध्ये ५४१ विहिरी खोदल्या

हरदीप सिंह पुरी म्हणाले की, तेलाचे खोदकाम शोधण्यासाठी खूप पैसे खर्च होतात. गयानामध्ये ४३ किंवा ४६ तेल विहिरी खोदल्या, प्रत्येकी १०० मिलियन डॉलर्स खर्चाच्या आहेत. ४७ व्या तेल विहिरीमध्ये त्यांना कच्च्या तेलाचे साठे सापडले आहेत.

ONGC या कंपनीने या वर्षी सर्वाधिक विहिरी खोदल्या आहेत. ONGC ने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५४१ विहिरी खोदल्या, या विहिरी खोदण्यावर ३७,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा खर्च कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.

भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा होणार

जर अंदमानमध्ये कच्च्या तेलाचे साठे मिळाले तर भारत तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.जर तसे झाले तर आर्थिक स्थिती मजबूत करू शकतो. भारत सध्या आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. देशाचा सर्वात जास्त खर्च कच्चा तेलावर होतो. 

८५% पेक्षा जास्त कच्चे तेल आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून मिळते

आकडेवारीनुसार, देशातील ८५% पेक्षा जास्त कच्चे तेल आंतरराष्ट्रीय पुरवठादारांकडून मिळते. जागतिक स्तरावर, अमेरिका आणि चीननंतर भारत हा कच्च्या तेलाचा तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे.

टॅग्स :खनिज तेलभारतपेट्रोल