Join us

भारताचा परकीय चलन साठा $653.96 अब्जांवर; 2 वर्षातील सर्वात मोठी वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 14:35 IST

India Forex Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात एका आठवड्यात $15.26 अब्जची वाढ झाली आहे.

Foreign Exchange Reserves:भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी वाढ झाली आहे. 7 मार्च 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात(एकाच आठवड्यात) परकीय चलनाच्या साठ्यात 15 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ही दोन वर्षांतील सर्वोच्च वाढ आहे. गेल्या काही काळापासून विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण हाताळण्यासाठी आरबीआयने डॉलरची केलेली विक्री, ज्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, 7 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $15.26 अब्जने वाढून $653.96 अब्ज झाला आहे. ही दोन वर्षांतील सर्वात मोठी उडी आहे. गेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा $1.78 अब्ज डॉलरने घसरून $638.69 अब्ज झाला होता. तर, सप्टेंबर 2024 च्या अखेरीस साठा $704.88 अब्ज डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. परंतु रिझव्र्ह बँकेने रुपयातील चढउतार कमी करण्यासाठी पुनर्मूल्यांकन, तसेच परकीय चलन बाजारात हस्तक्षेप केल्यामुळे या साठ्यात घट झाली होती. 

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, परकीय चलन साठ्याचा एक प्रमुख भाग असलेल्या परकीय चलन मालमत्ता, समीक्षाधीन आठवड्यात $ 13.99 अब्जने वाढून $ 557.28 अब्ज झाली आहे. डॉलरच्या अटींमध्ये उद्धृत केलेल्या परकीय चलन मालमत्तेमध्ये यूरो, पौंड आणि येन यांसारख्या गैर-अमेरिकन चलनांच्या परिणामाचा समावेश होतो. 

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, समीक्षाधीन आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य $ 1.05 अब्जने घसरून $ 74.32 अब्ज झाले आहे. SDR $ 212 दशलक्षने वाढून $ 18.21 अब्ज झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) मधील भारताचा गंगाजळी समीक्षाधीन आठवड्यात $69 दशलक्षने वाढून $4.14 अब्ज झाला आहे.

टॅग्स :भारतअर्थव्यवस्थाव्यवसायगुंतवणूक