नवी दिल्ली : जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत आणि दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था युरोपियन युनियन (ईयू) यांच्यात तब्बल १८ वर्षांच्या दीर्घ चर्चेनंतर ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (एफटीए) झाल्यामुळे भारतात अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. या ‘मदर ऑफ ऑल डील्स’मुळे लक्झरी मोटार गाड्या, परदेशी वाइन, चॉकलेट्स आणि औषधांवरील आयात शुल्कात प्रचंड कपात झाल्याने या वस्तू आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील. तंत्रज्ञान आणि अन्नापासून ते आरोग्यापर्यंत, युरोपियन गुणवत्तेची उत्पादने आता स्वस्त दरात उपलब्ध होऊन भारतीयांची जीवनशैली अधिक समृद्ध होणार आहे.
अमेरिका झाली अस्वस्थया करारावर अमेरिकेने अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. युरोपने युक्रेनमधील युद्धापेक्षा स्वत:च्या व्यापाराला अधिक महत्त्व दिले आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी युरोपीय देशांवर निशाणा साधला. बेसेन्ट म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावले होते. आम्ही युरोपलाही सोबत येण्याचे आवाहन केले होते; मात्र त्यांनी नकार दिला आहे.
युरोपची नवी जागतिक मैत्रीगेल्या वर्षभरात युरोपीय महासंघाने केवळ भारतच नव्हे, तर इतर देशांशीही संबंध दृढ केले आहेत. इंडोनेशिया आणि मर्कोसूर या दक्षिण अमेरिकन देशांशी व्यापार करार. जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाशी सामरिक भागीदारी केली आहे.
चीनला देणार शहचीनच्या वाढत्या आर्थिक प्रभावाला रोखण्यासाठी भारत आणि युरोप एकत्र आले आहेत. या करारामुळे भारताने चीनलाही शह दिला आहे.
कराराचा दोन अब्ज लोकांवर थेट परिणामब्रसेल्स : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनपेक्षित आणि आक्रमक व्यापार धोरणांमुळे युरोपीय महासंघाने आता आपले जागतिक धोरण बदलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेवरील आपले दशकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोपीय महासंघाने भारतासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार केला आहे. या कराराचा भारत आणि युरोपमधील सुमारे २ अब्ज लोकसंख्येला थेट फायदा होणार आहे.
लक्झरी गाड्या स्वस्त होणार का?भारत आणि युरोपीय महासंघातील ऐतिहासिक कराराचे मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू, ऑडी आणि स्कोडा यांसारख्या दिग्गज युरोपीय वाहन कंपन्यांनी स्वागत केले असून, याला जागतिक अर्थव्यवस्थेतील एक ‘मैलाचा दगड’ मानले आहे. मात्र, या करारामुळे महागड्या गाड्यांच्या किमती तातडीने कमी होतील, ही आशा बाळगणाऱ्या ग्राहकांना सध्या तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
महाराष्ट्राला काय फायदा?करारामुळे इचलकरंजी येथील गारमेंट उद्योगाला मोठा फायदा होईल. पुण्यातील इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, मुंबईतील रत्ने व दागिने उद्योग, ठाणे आणि रायगड येथील फार्मा क्षेत्राची निर्यात या करारामुळे वाढण्याची शक्यता आहे. या कराराचा फायदा फक्त कंपन्यांनाच होणार नसून शेतकरी, कारागीर, लहान व्यापारी, एमएसएमई आणि तरुणांना होणार आहे.
नेमके काय होणार? भारताकडे ईयूकडून येणाऱ्या ९६.६ टक्क्यांहून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क रद्द किंवा कमी केले जाईल.मूल्याच्या दृष्टीने भारताकडून युरोपमध्ये जाणाऱ्या ९९ टक्क्यांहून अधिक निर्याती शुल्कमुक्त होतील.काही संवेदनशील कृषी उत्पादने पूर्णपणे वगळण्यात आली आहेत.तांदूळ, साखर यांवर शुल्क कपात लागू होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
युरोपने अमेरिकेला पर्याय का शोधला?स्वतःची संरक्षण यंत्रणा : रशियाचा धोका आणि ट्रम्प यांची ‘नाटो’बद्दलची भूमिका पाहता युरोप आता स्वतःच्या संरक्षण उद्योगावर १५० अब्ज युरो खर्च करणार आहे. यात क्षेपणास्त्र संरक्षण, ड्रोन आणि एआय (एआय) तंत्रज्ञानाचा समावेश असेल.
ऊर्जेसाठी नवा शोध : रशियानंतर आता अमेरिकेवरील गॅस, तेलाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी युरोप आता यूएई आणि आखाती देशांशी चर्चा करत आहे. युरोपला इंधनासाठी मोठ्या प्रमाणात अमेरिकेवर अवलंबून राहावे लागते.
Web Summary : The India-EU free trade agreement will lower prices on luxury cars, wines, and medicines. The deal impacts two billion people, strengthening ties and countering China's economic influence, while America expresses concern. Maharashtra's industries benefit.
Web Summary : भारत-यूरोपीय संघ मुक्त व्यापार समझौते से लग्जरी कारें, वाइन और दवाएं सस्ती होंगी। इस समझौते से दो अरब लोगों पर असर पड़ेगा, संबंध मजबूत होंगे और चीन के आर्थिक प्रभाव का मुकाबला होगा, जबकि अमेरिका ने चिंता जताई है। महाराष्ट्र के उद्योगों को फायदा।