Join us

भारत किती देशांकडून तेल खरेदी करतो आणि कोणत्या देशांना विकतो? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 20:02 IST

India Crude Oil Import-Export: भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात आणि निर्यात करणारा देश आहे.

India Crude Oil Import-Export: रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५% शुल्क लादला आहे. भारत स्वस्त रशियन तेल खरेदी करतो आणि इतर देशांना जास्त किमतीत विकतो, असा अमेरिका आणि युरोपचा आरोप आहे. मात्र, या आरोपावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, जर कोणाला भारतातून तेल खरेदी करायचे नसेल, तर त्यांनी खरेदी करू नये.

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात आणि निर्यात करणारा देश आहे. आकडेवारी दर्शवते की, भारत त्याच्या गरजेच्या 85 टक्के पर्यंत इतर देशांकडून आयात करतो. भारत जगातील 40 देशांमधून तेल आयात करतो आणि त्यांतून विविध प्रकारचे पेट्रोलियम पदार्थ तयार करुन इतर देशांना विकतो. 

रशियाकडून सर्वाधिक तेल आयातभारत ज्या 40 देशांकडून तेल खरेदी करतो त्यामध्ये रशिया अव्वल स्थानावर आहे. २०२४ पासून भारताने रशियासोबत तेल व्यापार वाढवला आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रशिया हा भारताला तेल पुरवठा करणारा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. देशात आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या सुमारे एक तृतीयांश तेल रशियाकडून आले आहे.

रशियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा वर्षानुवर्षे २५% वाढून ३.९२ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. आकडेवारीनुसार, रशियाकडून कच्च्या तेलाची आयात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३.६१ अब्ज डॉलर्सवरून ८% वाढून १०.५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली. रशियाशिवाय, भारत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, कुवेत, नायजेरिया, मेक्सिको आणि ओमान येथून तेल आयात करतो. ब्राझील, कॅनडा, गयाना आणि सुरीनाम हेदेखील भारताला तेल पुरवठा करणारे देश आहेत.

भारत किती देशांना तेल विकतो?४० देशांकडून तेल आयात केल्यानंतर भारत तेलाचे काय करतो? भारत तेल आयात करतो पण ते पेट्रोलियम उत्पादन म्हणून इतर देशांना विकतो. म्हणजेच, कच्च्या तेलाचे शुद्धीकरण आणि प्रक्रिया केल्यानंतर ते इतर देशांना निर्यात केले जाते. 

भारत जगातील अनेक देशांना पेट्रोलियम उत्पादने पुरवतो. यामध्ये अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, युएई, युरोपीय देश तसेच दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. भारताकडून रिफाइंड तेल खरेदी करण्यात युरोप अव्वल आहे.

भारत कोणते पेट्रोलियम उत्पादने तयार करतो?भारत कच्चे तेल शुद्ध करतो आणि विविध क्षेत्रात वापरल्या जाणारे उत्पादने तयार करतो. यामध्ये हाय स्पीड डिझेल, पेट्रोल (मोटर स्पिरिट), इंधन तेल, विमानचालन टर्बाइन इंधन (इंधन) आणि रॉकेल यांचा समावेश आहे. या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर दैनंदिन जीवनात तसेच वाहतुकीत केला जातो. याशिवाय, त्यांचा वापर वीज निर्मिती, विमाने, लष्करी वाहने आणि पाणबुड्या चालविण्यासाठी केला जातो.

टॅग्स :खनिज तेलभारतरशियाअमेरिकापेट्रोलडिझेल