समुद्रामार्गे रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. जानेवारी २०२४ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. कारण अमेरिकेच्या नवीन निर्बंधांमुळे प्रमुख खरेदीदार (चीन, भारत आणि तुर्कस्तान) रशियन कच्च्या तेलापासून दूर जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन कच्च्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. याचा परिणाम लोडिंगपेक्षा जास्त अनलोडिंगवर झाला आहे, ज्यामुळे समुद्रात कच्च्या तेलाचा साठा वाढत आहे.
ब्लूमबर्ग शिप-ट्रॅकिंग डेटानुसार, २ नोव्हेंबरपर्यंत चार आठवड्यांत रशियन बंदरांहून दररोज सरासरी ३.५८ दशलक्ष बॅरल कच्चं तेल खरेदी केलं. २६ ऑक्टोबरपर्यंतच्या चार आठवड्यांच्या सुधारित आकड्यांपेक्षा हे सुमारे १.९ लाख बॅरल कमी आहे. चार आठवड्यांच्या सरासरी आणि साप्ताहिक आकड्यांमध्येही घट झाली आहे. या घसरणीमुळे रशियन कच्च्या तेलाच्या महसुलातही घट झाली आहे, यानं ऑगस्टनंतरची सर्वात कमी पातळी गाठली आहे.
५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्या, रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्याशी व्यापारावर अमेरिकेच्या निर्बंधांनंतर हे घडलं आहे. ट्रम्प यांच्या आदेशानंतर, भारतासह अनेक देशांनी रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे, अशी आशा आहे की असं केल्यानं ट्रम्प शुल्क कमी करतील.
समुद्रात वाढलं रशियान कच्चं तेल
सध्या रशियन कच्च्या तेलाचे निर्यातदार टँकरमध्ये कच्चं तेल भरत असले तरी, रिफायनरी ते तेल त्यांच्या स्टोरेज टँकमध्ये (Storage Tanks) घेण्यास फारसे उत्सुक नाहीत. यामुळे समुद्रात रशियन कच्च्या तेलाची मात्रा वाढून ३८ कोटी बॅरलपेक्षा जास्त झाली आहे. हा साठा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून २.७ कोटी बॅरलनं म्हणजेच ८% नी वाढला आहे.
तीन देशांवर काय परिणाम?
चीन, भारत आणि तुर्की या तीन देशांतील रिफायनरी कंपन्या सध्या निर्बंध असलेल्या तेलाचे कार्गो खरेदी करणे तात्पुरते थांबवत आहेत आणि पर्यायी पुरवठा शोधत आहेत.
महत्त्व: रशियाच्या समुद्रातून होणाऱ्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी ९५% पेक्षा जास्त खरेदी हे तीन देश मिळून करतात. त्यामुळे त्यांनी खरेदीत थोडी जरी कपात केली, तरी त्याची भरपाई करणं रशियासाठी जवळपास अशक्य होईल.
भारत: भारतातील अनेक मोठ्या तेल रिफायनरी कंपन्या, ज्या दररोज सुमारे १० लाख बॅरल रशियन कच्चा तेल खरेदी करत होत्या, त्यांनी सध्या खरेदी थांबवली आहे. कोणताही मार्ग निघेपर्यंत ते वाट पाहत आहेत.
चीन: चिनी रिफायनरी कंपन्याही असंच पाऊल उचलत आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांनंतर सरकारी कंपन्यांनीही काही रशियन कार्गो रद्द केले आहेत.
तुर्कस्तान: रशियाकडून तेल खरेदी करणारा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या तुर्कस्तानच्या रिफायनरीजनीही खरेदी कमी केली आहे. ते इराक, लिबिया, सौदी अरेबिया आणि कझाकिस्तान सारख्या लहान आणि जवळच्या पुरवठादारांकडून पर्यायी पुरवठा शोधत आहेत.
रशियाला होतंय नुकसान
तेलाच्या विक्रीत घट झाल्यामुळे रशियाचं नुकसान होऊ लागलं आहे. चार आठवड्यांच्या सरासरीनुसार, २ नोव्हेंबरपर्यंतच्या २८ दिवसांमध्ये रशियाच्या निर्यातीचं एकूण मूल्य दर आठवड्याला सुमारे ९ कोटी डॉलरनं कमी झालं असून ते १.३६ अब्ज डॉलर इतकं राहिलं आहे. या घसरणीत निर्यातीची मात्रा आणि किंमत या दोन्ही घटकांचा समावेश आहे.
Web Summary : Russian oil exports plummet due to US sanctions, impacting revenue. China, India, and Turkey reduce imports, seeking alternatives. Russia faces challenges compensating for this decline.
Web Summary : अमेरिकी प्रतिबंधों के कारण रूसी तेल निर्यात में गिरावट आई है, जिससे राजस्व प्रभावित हुआ है। चीन, भारत और तुर्की ने आयात कम किया है, विकल्प तलाश रहे हैं। रूस को इस गिरावट की भरपाई करने में चुनौतियों का सामना करना पड़ रहा है।