Join us

एअर कंडिशनिंग चेअर कार, डस्ट प्रूफ कोच... बुलेट ट्रेनमध्ये मिळतील 'या' लक्झरी सुविधा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:04 IST

India's First Bullet Train :  या ट्रेनमध्ये भारतीय परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. 

India's First Bullet Train :  नवी दिल्ली : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची तयारी जोरात सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (MAHSR) कॉरिडॉरच्या बुलेट ट्रेनच्या डिझाइनला भारत आणि जपानकडून अंतिम रूप दिले जात आहे. या ट्रेनमध्ये भारतीय परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. 

बुलेट ट्रेनमध्ये वातानुकूलित सीट्स, जास्त सामान क्षमता आणि डस्टप्रूफ डबे यासारख्या लक्झरी सुविधा मिळणार आहेत. ईटीच्या एका रिपोर्टनुसार, निम्म्याहून अधिक कंस्ट्रक्शन काम पूर्ण झाले असून ट्रॅक टाकण्याचे काम सुरू झाले आहे. बुलेट ट्रेनची डिझाइन फायनल स्तरावर आहे. अशा स्थितीत निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत ईटीने लिहिले आहे की, या डिझाईन्सना लवकरच औपचारिक मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार, बुलेट ट्रेन (शिंकानसेन ट्रेन) भारतीय परिस्थितीसाठी योग्य बनवण्यासाठी शिंकानसेन ट्रेनच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात येत आहेत. जपानमध्ये धावणारी बुलेट ट्रेन शिंकानसेन या नावाने ओळखली जाते. 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ती चालण्यास सक्षम केली जाईल.

यासोबतच भारतीय प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन ट्रेनमधील सामान क्षमता वाढवण्यात येणार आहे. धुळीपासून बचावासाठीही विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आसन व्यवस्थेतही बदल होऊ शकतो, ज्यामुळे प्रत्येक कोचमधील जागा पूर्वीपेक्षा कमी होऊ शकते.

जपानमधून रेल्वे ट्रॅक आयातजगभरातील हाय-स्पीड ट्रेन्स, जसे की फ्रान्सची टीजीव्ही आणि जपानची शिंकानसेन 250 किमी/तास पेक्षा जास्त वेगाने धावतात. भारतही या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत 50 टक्क्यांपेक्षा जास्त कंस्ट्रक्शन पूर्ण झाले आहे. हा कॉरिडॉर गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा-नगर हवेलीच्या परिसरातून जाणार आहे.अलीकडेच, गुजरातमधील MAHSR मार्गावर रेल्वे वेल्डिंगचे काम सुरू झाले आहे. अधिकृत निवेदनानुसार, या प्रकल्पासाठी रेल्वे ट्रॅक जपानमधून आयात करण्यात येत असून आतापर्यंत 60 किलोमीटरचे ट्रॅक टाकण्यात आले आहेत.

टॅग्स :बुलेट ट्रेनव्यवसायरेल्वेभारतीय रेल्वे