Join us

भारत होणार जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था; जपानला मागे टाकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 01:39 IST

Indian Economy News: लान्सेट जर्नलमधील अध्ययनात दावा

नवी दिल्ली : भारतीयअर्थव्यवस्था २०५० पर्यंत अमेरिका आणि चीननंतर जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असा दावा लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित एका अध्ययनात करण्यात आला आहे. श्रमिकांची लोकसंख्या आणि ढोबळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आणि अन्य घटकांच्या आधारे हे अध्ययन करण्यात आले.

सध्या भारतीय अर्थव्यवस्था फ्रान्स आणि ब्रिटननंतर पाचव्या स्थानी आहे. २०१७ मध्ये जगातील सातव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होती. वार्षिक आधार आणि आर्थिक वृद्धीची गती विचारात घेऊन हे अध्ययन करण्यात आले. आर्थिक वृद्धीची गती कायम राहिल्यास भारत जपानाला मागे टाकून तिसºया क्रमाकांची अर्थव्यवस्था होईल.जीडीपी घसरलाकोरोनाच्या सर्वव्यापी साथीमुळे भारतासह जगातील सर्व अर्थव्यवस्थांना फटका बसल्याने अनेक व्यवसाय तोट्यात आहेत.यावर्षी भारताचा जीडीपी एप्रिल-जून या तिमाहीत २३.९ टक्क्यांनी घसरला. ३.१ टक्के दराने अर्थव्यवस्थेची वृद्धी झाली. आर्थिक वृद्धीचा दर हा गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक धीमा आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्थाचीनअमेरिकाभारत