Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतात एका वर्षात २४ नव्या अब्जाधीशांची भर, एकूण संख्या २२९ वर; मित्तल यांची रोजची कमाई २७४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 15:42 IST

Forbes Billionaire List: भारतात एका वर्षात २४ अब्जाधीशांची भर पडली आहे. यामुळे देशातील अब्जाधीशांची एकूण संख्या २०२५ च्या तुलनेत वाढून आता २२९ वर पोहोचली. पाहा कोण आहेत या यादीत?

Forbes Billionaire List: फोर्ब्स वर्ल्ड्स बिलेनिअर्स २०२६ च्या यादीनुसार, भारतात एका वर्षात २४ अब्जाधीशांची भर पडली आहे. यामुळे देशातील अब्जाधीशांची एकूण संख्या २०२५ च्या तुलनेत वाढून आता २२९ वर पोहोचली. देशातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीत यावर्षी सर्वाधिक वेगानं वाढ झाली आहे.

त्यांच्या 'आर्सेलरमित्तल' कंपनीच्या शेअर्समध्ये ८० टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे त्यांची एकूण संपत्ती ३१ अब्ज डॉलर (२.८७ लाख कोटी रुपये) झाली आहे. गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत २० अब्ज डॉलरची (१.८५ लाख कोटी रुपये) भर पडली असून, या हिशोबानं मित्तल यांनी वर्षभरात दररोज सरासरी २७४ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. विशेष म्हणजे, 'फिजिक्सवाला'चे संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी यांचाही या यादीत समावेश झाला आहे.

टॉप-१० मध्ये उदय कोटक यांचा प्रवेश

ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या तिसऱ्या क्रमांकावर असून त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला कायम आहेत. या यादीत एकूण २० भारतीय महिला अब्जाधीशांचा समावेश आहे. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी यावर्षी टॉप-१० मध्ये स्थान मिळवलंय; त्यांना नुकतंच पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या एन्ट्रीमुळे डीएलएफचे कुशल पाल सिंह आता १२ व्या क्रमांकावर घसरले आहेत.

७६०० रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोन्याच्या दरातही मोठी घसरण; पटापट चेक करा लेटेस्ट दर

पेटीएमच्या संस्थापकांचं पुनरागमन

एडटेक प्लॅटफॉर्म 'फिजिक्सवाला'चे संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी हे नवीन अब्जाधीशांच्या लिस्टमध्ये सामील झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये कंपनीचा आयपीओ (IPO) आल्यानंतर त्यांनी या क्लबमध्ये प्रवेश केला. दरम्यान, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा तीन वर्षांनंतर पुन्हा या यादीत परतलेत. गेल्या वर्षी पेटीएमचे शेअर्स सुमारे ६० टक्क्यांनी वधारले असले, तरी ते अजूनही आयपीओच्या किमतीच्या निम्म्या किमतीवर व्यवहार करत आहेत.

फोर्ब्स इंडिया रिच लिस्टचा इतिहास

फोर्ब्स इंडियानं आपली पहिली श्रीमंतांची यादी २००९ मध्ये प्रसिद्ध केली होती. ही यादी कुटुंब आणि व्यक्तींकडून मिळालेली शेअरहोल्डिंग आणि आर्थिक माहिती, स्टॉक एक्सचेंज, विश्लेषक आणि बाजारपेठेतील डेटाच्या आधारे तयार केली जाते. या यादीतील निव्वळ संपत्तीची गणना अमेरिकन डॉलरमध्ये केली जाते. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Adds 24 New Billionaires; Mittal Earns ₹274 Crore Daily

Web Summary : India's billionaire count rises to 229 with 24 new additions. Lakshmi Mittal's wealth surged, earning ₹274 crore daily. Physicswallah founders join the list, while Paytm's founder returns after three years. Savitri Jindal remains India's richest woman.
टॅग्स :फोर्ब्सभारत