Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील १२ अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात ऐतिहासिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 07:07 IST

देशातील म्युच्युअल कंपन्यांच्या इतिहासात इतकी मोठी वेतनवाढ आतापर्यंत कधीही झाली नव्हती.

नवी दिल्ली : २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये देशातील १२ अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) वेतनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे सीईओ मिलिंद बर्वे यांना सर्वाधिक वेतनवाढ मिळाली होती.

याच कालावधीत आदित्य बिर्ला सनलाइफ, निप्पॉन इंडिया, डीएसपी म्युच्युअल फंड या कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात १९ टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. २०१८-१९ या वर्षात म्युच्युअल कंपनीने केलेल्या व्यवसायाच्या आधारे ही वेतनवाढ किंवा कपात करण्यात आली आहे. देशातील म्युच्युअल कंपन्यांच्या इतिहासात इतकी मोठी वेतनवाढ आतापर्यंत कधीही झाली नव्हती. एचडीएफसी म्युच्युअल फंडचे सीईओ मिलिंद बर्वे यांना मोठी वेतनवाढ मिळून त्यांचे २०१९-२० वर्षातील एकूण वेतन ७ कोटी ४३ लाख रुपये इतके झाले. त्याआधी २०१८-१९ या वर्षात त्यांचे वार्षिक वेतन ७.२३ कोटी रुपये होते. एसबीआय म्युच्युअल फंड ही कंपनी या क्षेत्रात देशातील सर्वात मोठी कंपनी असून, तिचे सीईओ अश्वनी भाटिया यांना २०१९-२० या वर्षात एकूण ५१ लाख रुपये वेतन देण्यात आले. देशातील सर्व म्युच्युअल कंपन्यांच्या सीईओंमध्ये सीबीआय म्युच्युअल फंड कंपनीच्या सीईओचे वार्षिक वेतन सर्वात कमी आहे.

सर्वाधिक वार्षिक वेतन घेणाºया म्युच्युअल कंपन्यांच्या सीईओंमध्ये मिलिंद बर्वे यांच्यानंतर कोटक म्युच्युअल फंडचे सीईओ नीलेश शाह यांचा क्रमांक लागतो. नीलेश शाह यांना २०१९-२० या आर्थिक वर्षात ७ कोटी ३२ लाख रुपये इतके वार्षिक वेतन मिळाले. त्याआधीच्या वर्षी त्यांना ४ कोटी ३५ लाख रु पये इतके वार्षिक वेतन होते.निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचे सीईओ सुदीप सिक्का यांना २०१९-२० या कालावधीत ६ कोटी १ लाख इतके वार्षिक वेतन मिळाले. त्या आधीच्या वर्षापेक्षा हे वेतन ८ टक्क्यांनी कमी आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडचे व्यवस्थापकीय संचालक निमेश शाह यांना २०१९-२० या आर्थिक वर्षात ६ कोटी ९८ लाख रु पये इतके वार्षिक वेतन मिळाले. त्याआधीच्या वर्षात त्यांना ६ कोटी २५ लाख रु पये वार्षिक वेतन होते. ज्यामध्ये नंतर १२ टक्के वाढ झाली.

 

टॅग्स :एचडीएफसी