Join us

Income Tips: फक्त 50000 रुपये या व्यवसायात गुंतवा; महिन्याला 40000 रुपयांपर्यंत कमाई करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 19:56 IST

How to earn money from home: कस्टमाइज्ड टी शर्ट प्रिंट (Customized T-Shirt Print) हा एक चांगला व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय कमी पैशांत आणि घरातूनही करता येऊ शकतो.

Earn Money with new Business: आज आम्ही तुम्हाला अशा व्य़वसायाबाबत सांगणार आहोत, ज्याची आज मार्केटमध्ये खूप क्रेझ आहे. हा बिझनेस स्मॉल स्केलमधील टी शर्ट प्रिंटिंग (T-Shirt Printing) चा. प्रिंटेड टी शर्ट (Printed T-Shirt) सध्या बाजारात खूप डिमांडमध्ये आहेत. बर्थडे असेल किंवा कोणताही कार्यक्रम असला की त्यांना लोगो, नाव टी शर्टवर लागते. किंवा वाढदिवस असला तर मित्रांचे फोटो, टॅग आदी प्रिंट करतात. शाळा, कंपन्या, खेळाडूंकडूनही मोठी मागणी असते. यामुळे या व्यवसायातून कमाईदेखील चांगली होण्याची शक्यता आहे. (You can earn money from t shit printing business.)

कस्टमाइज्ड टी शर्ट प्रिंट (Customized T-Shirt Print) हा एक चांगला व्यवसाय म्हणून उदयास आला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा व्यवसाय कमी पैशांत आणि घरातूनही करता येऊ शकतो. तुम्ही केवळ 50000 रुपये ते 70000 रुपये गुंतवून टीशर्ट प्रिंटिंगचा व्य़वसाय करू शकता. याद्वारे तुम्ही महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमावू शकता. गावा, तालुक्याच्या ठिकाणी क्रिकेट, कब्बडी, व्हॉलिबॉल सारखे अनेक संघ असतात. गणपतीत, दही हंडी, गरबा आदी सणांसाठी देखील मोठी मागणी असते. यामुळे जर तुमची ओळख चांगली असेल आणि तुम्ही हा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला तर तो तुम्ही वाढवूह शकता. मग तुमचे उत्पन्न लाखोंतही होऊ शकते. 

गणित पहा....प्रिंटिंग मशीन 50 हजार रुपये आहे. सामान्य क्वालिटीचा टीशर्ट 120 रुपये ते 200 रुपये असेल तर त्यावर प्रिंट करण्याचा खर्च 1 ते 10 रुपये येतो. तो तुम्ही 250 ते 300 रुपयांना विकू शकता. समजा तुम्हाला कोणी शर्ट आणून दिला तर किमान 100 रुपये तुम्ही प्रिंट करण्याचे घेऊ शकता. 

ऑनलाईन विक्रीआजकाल सोशल मीडियावर लोक बऱ्याच गोष्टी शोधत असतात, विकतात. तुमचा व्य़वसाय वाढविण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. कमी खर्चात तुम्ही एक ब्रँड बनवून किंवा ई-क़ॉमर्सद्वारे ते विकू शकता. 

टॅग्स :व्यवसायपैसा