Union Budget
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Union Budget 2025: १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार; अर्थमंत्र्यांनी काय 'गेम' खेळला?

Union Budget 2025: १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार; अर्थमंत्र्यांनी काय 'गेम' खेळला?

Income Tax Slab Changes 2025 New vs Old Tax Regime: जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:12 IST2025-02-01T13:04:22+5:302025-02-01T13:12:55+5:30

Income Tax Slab Changes 2025 New vs Old Tax Regime: जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. 

Income Tax Union Budget 2025: If you want to make income up to Rs 12 lakh tax-free, you have to do this; what 'game' did the Finance Minister play? | Union Budget 2025: १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार; अर्थमंत्र्यांनी काय 'गेम' खेळला?

Union Budget 2025: १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करायचे असेल तर हे करावेच लागणार; अर्थमंत्र्यांनी काय 'गेम' खेळला?

New vs Old Tax Regime: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असलेल्या करदात्यांचा कर माफ करण्याची घोषणा करून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करोडो करदात्यांना अनपेक्षित असा सुखद धक्का दिला आहे. परंतू, ही करमाफी केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांना (New Tax Regime Updates 2025) लागू होणार आहे. जुनी कर प्रणाली निवडलेल्या करदात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही. 

नव्या जुन्या सर्वांसाठी...! ईलेक्ट्रीक वाहनेच नाही मोबाईलही स्वस्त होणार; बॅटरीच्या किंमती कमी होणार, अर्थसंकल्पात घोषणा

नवीन कर प्रणालीकडे बहुतांश करदात्यांनी पाठ फिरविली होती. आधीपासूनच म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, घरावरील कर्ज आदी गोष्टींमुळे लाभ मिळत असल्याने या करदात्यांनी जुनी टॅक्स सिस्टिमच ठेवली होती. हे करदाते जुन्या प्रणालीवरून नवीन कर प्रणालीवर येण्यासाठी सीतारामण यांनी नवीन खेळी खेळली आहे. 

यामुळे आता बऱ्याच करदात्यांना जुन्या कर प्रणालीवरून नवीन कर प्रणालीकडे जाण्यासाठी भाग पाडले जाणार आहे. जुन्या कर प्रणालीतील करदात्यांना कोणताही सूट देण्यात आलेली नाही. त्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

२,५०,००० रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर शून्य आयकर भरावा लागणार आगहे. तर २,५०,००१ ते ५,००,००० रुपयांदरम्यान - ५% टक्के, ५,००,००१ ते १०,००,००० उत्पन्न असलेल्यांना २०% व १०,००,००० पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ३०% कर भरावा  लागणार आहे. नव्या कर प्रणालीचा लाभ घेण्यासाठी आता कर दात्यांना स्विच व्हावेच लागणार आहे.

कसा आहे नवा स्लॅब...

० ते ४ लाखांपर्यंत - काहीही कर नाही
४ लाख ते ८ लाखांपर्यंत - ५ टक्के
८ लाख ते १२ लाख - १० टक्के
१२ लाख ते १६ लाख - १५ टक्के
१६ ते २० लाख - २० टक्के
२० लाख ते २४ लाख - २५ टक्के
२४ लाखांच्या वर - ३० टक्के
 

Web Title: Income Tax Union Budget 2025: If you want to make income up to Rs 12 lakh tax-free, you have to do this; what 'game' did the Finance Minister play?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.