Join us

१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:10 IST

India China Three decades journey: आर्थिकदृष्ट्या सध्या चीन भारतापेक्षा खूप पुढे आहे. पण तीन दशकांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. त्यावेळी भारत आणि चीन एकाच ठिकाणी होते. मात्र, नंतर चीननं अशी काही गती पकडली की तो भारतापेक्षा खूप पुढे निघून गेलाय.

India China Three decades journey: आर्थिकदृष्ट्या सध्या चीनभारतापेक्षा खूप पुढे आहे. पण तीन दशकांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. त्यावेळी भारत आणि चीन एकाच ठिकाणी होते. मात्र, नंतर चीननं अशी काही गती पकडली की तो भारतापेक्षा खूप पुढे निघून गेलाय. आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी भारत आणि चीनच्या आर्थिक प्रवासाची तुलना केली आहे.

गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "१९९० मध्ये भारत आणि चीन एकाच सुरुवातीच्या बिंदूवर होते. तीन दशकांनंतर, चीनचा जीडीपी (GDP) भारताच्या जीडीपीच्या जवळपास पाचपट आहे. या फरकाचे कारण काय आहे?" त्यांनी 'चीन विरुद्ध इंडिया' नावाच्या एका छोट्या थ्रेडमध्ये हा फरक समजावून सांगितलाय.

"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं

चीन कसा गेला पुढे?

गोएंका यांच्या मते, चीनच्या प्रगतीचे रहस्य 'फोकस्ड एक्झिक्युशन' (म्हणजेच कोणतेही काम पूर्ण एकाग्रता आणि योजनेसह पूर्ण करणे) आणि सरकारचा समन्वय हे होते. त्यांनी सांगितलं की, चीननं सातत्यानं एक्झिक्युशनवर लक्ष केंद्रित केलं. पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. सुरुवातीलाच कृषी आणि श्रम सुधारणा केल्या. सरकारच्या समन्वयानं निर्यात-आधारित उद्योग उभे केले आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी इकोसिस्टम तयार केली.

भारताचा प्रवास कसा राहिला?

त्यांनी याची तुलना भारताच्या संथ पण अधिक लोकशाही मार्गाशी केली. त्यांनी सांगितलं की, भारताचा मार्ग संथ पण अधिक लोकशाही होता. हर्ष गोएंका त्यांच्या पोस्टमध्ये लिहितात की, भारत उत्पादनापेक्षा सेवा क्षेत्रात जास्त मजबूत झाला. सुधारणा सर्वानुमते झाल्या. विकास हा केंद्रीय नियोजनाऐवजी उद्योजकता आणि उपभोगातून प्रेरित होता.

दोघांची स्वतःची बलस्थाने आणि कमतरता

गोएंका यांनी कबूल केलं की, दोन्ही मॉडेल्सची स्वतःची बलस्थाने आणि कमतरता होत्या. त्यांनी सांगितलं की, चीनच्या मॉडेलनं वेग आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं, पण त्यात वाढते कर्ज, म्हातारी होत असलेली लोकसंख्या आणि केंद्रीकृत जोखीम यांसारख्या समस्याही आल्या. भारताचा मॉडेल स्थिरता, समावेशन आणि लवचिकता देतो, पण त्याला नोकऱ्या, कौशल्ये आणि उत्पादन उत्पादनांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

पुढे काय आहे भविष्य?

गोएंका यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, चीन दाखवतो की शिस्त आणि योग्य दिशा काय साध्य करू शकते. भारताला आता हे दाखवावं लागेल की लोकशाही आणि विविधता काय करू शकते. आगामी दशक हे ठरवेल की केवळ कोण कोणाची नक्कल करतो, हेच नाही, तर बदलत्या जगाशी सर्वात चांगला समन्वय कोण साधतो.

तीन दशकांचा प्रवास कसा होता?

१९९० मध्ये भारताचे प्रति व्यक्ती उत्पन्न सुमारे ३६७ डॉलर्स होते, जे चीनच्या ३१७ डॉलर्स पेक्षा थोडं जास्त होतं. २००० पर्यंत चीनने सरासरी ९ ते १० टक्के जीडीपी वाढ साधली, तर भारताची वाढ ५ ते ६ टक्के राहिली. २०२५ पर्यंत चीनचा नॉमिनल जीडीपी सुमारे १९ ट्रिलियन डॉलर झाला आहे. तर भारताची अर्थव्यवस्था सुमारे ४ ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजेच, चीनची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत जवळपास ५ पट जास्त आहे. एवढंच नाही, तर चीनचं प्रति व्यक्ती उत्पन्नही भारतापेक्षा सुमारे ५ पट जास्त आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India and China's divergent paths: A business leader's perspective.

Web Summary : In 1990, India and China were economically similar. China surged ahead due to focused execution, infrastructure investment, and export-oriented industries. India's democratic path prioritized services and entrepreneurship. While China saw rapid growth, India offers stability, but needs more focus on jobs and manufacturing.
टॅग्स :भारतचीनअर्थव्यवस्था