Join us

Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:42 IST

Vi Recharge Plans: व्हीआयनं आपली ५जी सेवा सुरू केल्यापासून कंपनीत नवा उत्साह निर्माण झाला आहे. कंपनी एकापाठोपाठ एक खास प्लान्स देत असून सध्याच्या प्लान्समध्येही बदल करत आहे.

Vi Recharge Plans: व्हीआयनं आपली ५जी सेवा सुरू केल्यापासून कंपनीत नवा उत्साह निर्माण झाला आहे. कंपनी एकापाठोपाठ एक खास प्लान्स देत असून सध्याच्या प्लान्समध्येही बदल करत आहे. कंपनीनं आपल्या १९९ आणि १७९ रुपयांच्या प्लान्समध्येही असेच काहीसे केलेत. ज्यामध्ये डेटा आणि वैधता वाढवण्यात आली आहे. या दोन्ही प्लानमधील बदलांबद्दल सविस्तर बोलण्याआधी जाणून घेऊया की ५जी च्या शर्यतीत व्हीआय एअरटेल आणि जिओच्या मागे आहे.

मात्र, Vi नं संधीचं सोनं करून घेण्यास सुरुवात केलीये. खरं तर, आता एअरटेल आणि जिओनं ऑफर्स देण्यापेक्षा जास्त प्लानमधून कमाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे, व्हीआयनं ५ जी उशिरा आणलं असलं तरी ते ग्राहकांना एकापेक्षा एक ऑफर देत आहे. अशा तऱ्हेनं ग्राहकांना आता एअरटेल-जिओपेक्षा व्हीआय अधिक आकर्षक वाटू लागलाय.

किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी

१९९ रुपयांच्या प्लानमध्ये काय बदल?

Vi चा १९९ रुपयांचा प्लान विशेषतः त्यांच्यासाठी आहे जे कमी किमतीत कॉलिंग आणि डेटा संबंधित प्लान हवा आहे. या प्लानमध्ये, युझर्सना एका महिन्यासाठी ३०० एसएमएस, २८ दिवसांची वैधता आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. यासोबतच या प्लॅनमध्ये ३ जीबी इंटरनेट डेटा देखील दिला जातो. या प्लानमध्ये पूर्वी फक्त २ जीबी डेटा उपलब्ध होता. कंपनी आता एका खास ऑफर अंतर्गत त्यात १ जीबी अतिरिक्त डेटा देखील देत आहे. हे हा डेली डेटा प्लॅन नाही, म्हणजेच तुम्हाला दररोज नवीन डेटा मिळणार नाही परंतु हा ३जीबी डेटा संपूर्ण २८ दिवसांसाठी असेल. हा प्लान त्यांच्यासाठी चांगला आहे जे जास्त इंटरनेट वापरत नाहीत, शिवाय त्यांना केवळ कॉलिंग आणि काही डेटाची आवश्यकता आहे.

Vi च्या १७९ रुपयांचा प्लान

Vi चा १७९ रुपयांचा प्रीपेड प्लान अशा युझर्ससाठी आहे ज्यांना कमी किमतीत कॉलिंग आणि बेसिक डेटा सुविधा हव्या आहेत. या प्लानमध्ये तुम्हाला १ जीबी डेटा, अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतील. विशेष म्हणजे पूर्वी या प्लानची वैधता फक्त २४ दिवस होती, परंतु आता एका खास ऑफर अंतर्गत ती २८ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की ग्राहक आता आणखी चार दिवसांसाठी ही सेवा वापरू शकतात, तेही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय.

जे लोक इंटरनेटचा वापर खूप कमी करतात आणि मुख्यतः कॉलिंगसाठी रिचार्ज करतात त्यांच्यासाठी हा प्लान खूप फायदेशीर आहे. आजच्या काळात, विशेषतः जेव्हा दर सतत वाढत असतात तेव्हा १७९ रुपयांमध्ये २८ दिवसांची वैधता सहसा कोणत्याही नेटवर्कमध्ये मिळत नाही. याशिवाय, वी त्यांच्या अॅपद्वारे रिचार्ज केल्यावर निवडक प्लॅनवर विशेष सवलती देखील देत आहे. यासाठी तुम्ही Vi च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)एअरटेलरिलायन्स जिओ