Join us

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, १ तारखेपासून ब्लॉक होणार 'ही' ट्रान्झॅक्शन्स, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:16 IST

UPI Payments News: आजकाल यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून पेमेंट करणं खूप सामान्य झालंय. भाजीपाल्याच्या स्टॉलपासून ते मोठमोठ्या मॉल्स, दुकानांपर्यंत पैसे या माध्यमातून देणं सोपं झालंय.

आजकाल यूपीआय म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून पेमेंट करणं खूप सामान्य झालंय. भाजीपाल्याच्या स्टॉलपासून ते मोठमोठ्या मॉल्स, दुकानांपर्यंत पैसे या माध्यमातून देणं सोपं झालंय. जर तुम्हीही यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की एनपीसीआय १ फेब्रुवारीपासून काही व्यवहार ब्लॉक करणार आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) एक परिपत्रक जारी करून १ फेब्रुवारीपासून विशेष कॅरेक्टर्सनं तयार केलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती दिली आहे. युझर्स केवळ अल्फान्यूमेरिक कॅरेक्टरसह तयार केलेल्या आयडीद्वारे व्यवहार करू शकतील. जे टेक्निकल स्पेसिफिकेशन फॉलो करणार नाहीत, अशा लोकांचा आयडी ब्लॉक केला जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.

यूपीआय व्यवहार वाढविण्याचं उद्दिष्ट

एनपीसीआयनं हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा रिटेल पेमेंट ऑपरेटरनं व्यवहारांसाठी यूपीआय पर्यायाचा वापर वाढविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर भारतात डिजिटल व्यवहार वेगानं सुरू झाले.

केसेस झाल्या कमी

नॅशनल पेमेंट्स इंटरफेस ऑफ इंडियानं यापूर्वीच लोकांना यूपीआय आयडीसाठी स्पेशल कॅरेक्टर्सऐवजी अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर वापरण्याचा सल्ला दिला होता. ज्यानंतर अनेकांनी तसे बदल केले, पण तरीही काही युजर्स अद्याप ते फॉलो करत नाहीत. आता एनपीसीआय त्याचं पालन करण्यासाठी कठोरतेचा अवलंब करणार आहे. जेणेकरून यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये कोणीही कोणतेही स्पेशल कॅरेक्टर वापरणार नाही.

यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार अगदी सहजपणे केले जातात. त्यामुळे त्याचा वापरही वाढत आहे. एकट्या डिसेंबर २०२४ पर्यंत यूपीआय व्यवहारांची संख्या १६.७३ अब्जांवर पोहोचली होती.

टॅग्स :बँकपैसा