Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपाचा परिणाम : सांगली आगारास पावणेतीन कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 15:52 IST

वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचा-यांनी ऐन दिवाळीत सुरू केलेला संप मागे घेतल्याने शनिवारी सकाळपासून एसटीची चाके पुन्हा फिरू लागली.

सांगली - वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाºयांनी ऐन दिवाळीत सुरू केलेला संप मागे घेतल्याने शनिवारी सकाळपासून एसटीची चाके पुन्हा फिरू लागली. दिवाळीची भाऊबीज आणि संप मिटल्याने प्रवाशांची सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर प्रचंड गर्दी होती. गर्दी लक्षात घेऊन विविध मार्गावर एसटीच्या फे-या वाढविण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली. राज्यातील एसटी कर्मचा-यांनी १७ आॅक्टोबरपासून संपाची हाक दिली होती. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले होते. ऐन दिवाळीत संप सुरू झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. पोलिस, प्रशासन व आरटीओ यांनी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वडाप वाहने बस स्थानकावर उभी केली होती. मालवाहू वाहनांतूनही प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. वडाप व रिक्षाला गर्दी वाढली होती. रेल्वेही हाऊसफुल्ल होत्या. चार दिवसानंतर कर्मचा-यांनी शनिवारी संप मागे घेतला. सकाळी सहा वाजता कर्मचारी ड्युटीवर हजर झाले. सकाळी सातपासून एसटीची थांबलेली चाके पुन्हा पळू लागली. शनिवारी भाऊबीज असल्याने प्रवाशांची गावाला जाण्यासाठी गर्दी होती. गर्दी लक्षात घेऊन व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोल्हापूर, इचलकरंजी, क-हाड, सातारा व पुणे या मार्गावर एसटीच्या १४ फे-या वाढविण्यात आल्या होत्या. शनिवारी दिवाळीला गावाकडे आलेल्या नोकरदारांची पुन्हा नोकरीवर जाण्यासाठी लगबग सुरु होणार आहे. यासाठी शनिवारी पुण्यासाठी एसटीच्या २० फेºया वाढविण्यात आल्या आहेत.  चार दिवसांतील उत्पन्नाला फटका१७ आॅक्टोबर : ७५ लाख१८ आॅक्टोबर : ७० लाख १९ आॅक्टोबर : ६० लाख२० आॅक्टोबर : ६० लाख एसटीच्या फे-यासांगली आगारातर्फे राज्यातील विविध शहरे तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज सुमारे दोन हजार ४५३ फेºया होतात. यातून सुमारे दोन लाख ९९ हजार किलोमीटरचा प्रवास होतो. कर्मचाºयांनी संप मागे घेतल्याने अखेर एसटीची चाके पुन्हा पळू लागली. सांगली, मिरजेतील बसस्थानके गर्दीने फुलली. तालुका बसस्थानकेही प्रवाशांनी गजबजली होती.

टॅग्स :एसटी संपमहाराष्ट्र