Join us

काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 14:22 IST

Mygate Abhishek Kumar : आयआयटी आणि आयआयएममधून शिक्षण घेतलेले अभिषेक कुमार हे मायगेटचे सह-संस्थापक आहेत.

Mygate Abhishek Kumar : आयआयटी आणि आयआयएममधून उच्च शिक्षण घेऊन, गोल्डमन सॅक्स सारख्या जागतिक बँकेत १ कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडून कुणी सुरक्षा रक्षक होईल असं तुम्हाला वाटतं का? पण, हे खरं करून दाखवलंय अभिषेक कुमार यांनी! उद्योगपती हर्ष गोयंका यांनी नुकतीच त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये अभिषेक कुमार यांची ही प्रेरणादायी कहाणी शेअर केली, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.

२०१६ मध्ये अभिषेक कुमार यांनी आपली आलिशान नोकरी सोडून मायगेट नावाचे स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज हे अॅप भारतातील २५,००० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ४० लाखांहून अधिक लोक वापरतात, ज्यामुळे सुरक्षा आणि समुदाय व्यवस्थापन खूप सोपे झाले आहे.

सुरक्षा रक्षक बनण्यामागचे 'ते' कारण!मायगेटसारखे मोठे अॅप तयार करण्यापूर्वी अभिषेक कुमार यांनी एक अविश्वसनीय गोष्ट केली! त्यांनी स्वतः सुरक्षा रक्षकाचा गणवेश घातला आणि इतर कोणत्याही रक्षकाप्रमाणे पूर्ण १४ तासांची शिफ्ट करून काम केले. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण यामागे एक मोठा विचार होता.

अभिषेकने त्याच्या लिंक्डइन पोस्टमध्ये सांगितले की, सुरक्षा रक्षकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी आणि समस्या जवळून समजून घेण्यासाठी त्याने हे केले. या अनुभवातून त्यांना स्पष्ट झाले की, सुरक्षा रक्षक १४ तासांच्या शिफ्टमध्ये ५० हून अधिक कॉल्स कसे हाताळतात, भेट देणाऱ्यांची नोंद मॅन्युअली कशी ठेवतात आणि तरीही त्यांना रहिवाशांच्या तक्रारींचा सामना का करावा लागतो.

वाचा - सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

अनुभव घेतल्यानंतर मायगेटची स्थापनाया सर्व अनुभवातून मिळालेल्या शिक्षणासह, अभिषेक कुमार आणि त्यांच्या सह-संस्थापकांनी मायगेट कंपनीची स्थापना केली. या अॅपने गृहनिर्माण सोसायट्यांमधील सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या समस्या खूप सोप्या केल्या आहेत. गोल्डमन सॅक्समधील उच्च पगाराची नोकरी सोडून, जमिनीवर उतरून प्रत्यक्ष कामगारांच्या समस्या समजून घेण्याची अभिषेक कुमार यांची ही कृती खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. उद्योजकतेमध्ये 'ग्राहक' समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते. 

टॅग्स :व्यवसायनोकरीमाहिती तंत्रज्ञान