IIP Growth News: युरोपियन युनियनसोबतच्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादनात ७.८ टक्क्यांची जबरदस्त झेप नोंदवण्यात आली आहे. खाणकाम, उत्पादन आणि वीज अशा महत्त्वाच्या क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीमुळे ही वाढ झाली असून गेल्या दोन वर्षांतील हा उच्चांकी स्तर आहे.
औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये ही वाढ ३.७ टक्के होती, जी आता वाढून ७.८ टक्क्यांवर पोहोचली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये ही वाढ ७.२ टक्के (सुधारित) इतकी नोंदवण्यात आली होती. सरकारी निवेदनानुसार, औद्योगिक हालचालींना वेग मिळाल्यानम हा निर्देशांक दोन वर्षांहून अधिक काळातील उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.
IIP च्या अंदाजात सुधारणा
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं (NSO) नोव्हेंबर २०२५ साठीच्या औद्योगिक उत्पादन वाढीच्या अंदाजातही सुधारणा केली आहे. सुरुवातीला हा अंदाज ६.७ टक्के व्यक्त करण्यात आला होता, जो आता सुधारून ७.२ टक्के करण्यात आला आहे.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी
NSO च्या आकडेवारीनुसार विविध क्षेत्रांतील वाढ खालीलप्रमाणे आहे:
- मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र: या क्षेत्रातील उत्पादनात ८.१ टक्क्यांची वाढ झाली आहे (डिसेंबर २०२४ मध्ये ही वाढ ३.७ टक्के होती).
- खाणकाम क्षेत्र : या क्षेत्रात ६.८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे (गेल्या वर्षी याच काळात २.७ टक्के होती).
- वीज निर्मिती : वीज उत्पादनात ६.३ टक्क्यांची वाढ झाली असून गेल्या वर्षी याच महिन्यात ती ६.२ टक्के होती.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीचे संकेत
चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत औद्योगिक उत्पादनाचा विकास दर गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा कमी झाला आहे. वार्षिक आधारावर हा दर ४.१ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर आला आहे. ही आकडेवारी दर्शवते की वर्षाच्या अखेरीस औद्योगिक कामांमध्ये मोठी तेजी आली असली, तरी संपूर्ण वर्षाच्या सरासरी वाढीमध्ये किंचित घट झाली आहे.
Web Summary : Post EU deal, India's industrial output surged 7.8% in December 2025, a two-year high. Manufacturing, mining, and electricity sectors drove the growth. NSO revised November's growth to 7.2%. April-December growth slightly decreased to 3.9% annually, despite the late-year surge.
Web Summary : EU समझौते के बाद, दिसंबर 2025 में भारत का औद्योगिक उत्पादन 7.8% बढ़ा, जो दो साल में सबसे अधिक है। विनिर्माण, खनन और बिजली क्षेत्रों ने विकास को गति दी। एनएसओ ने नवंबर की वृद्धि को 7.2% संशोधित किया। अप्रैल-दिसंबर की वृद्धि थोड़ी घटकर वार्षिक रूप से 3.9% हो गई, देर से साल में उछाल के बावजूद।