Join us

कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:46 IST

PPF Investment: प्रत्येकाला आयुष्यात चांगले पैसे कमवायचे असतात आणि कोट्यधीश बनण्याचं त्यांचं स्वप्नही असतं. परंतु हे इतकं सोपं नाही. यासाठी तुम्हाला आर्थिक शिस्त लावून घेणं आवश्यक आहे.

PPF Investment: प्रत्येकाला आयुष्यात चांगले पैसे कमवायचे असतात आणि कोट्यधीश बनण्याचं त्यांचं स्वप्नही असतं. परंतु हे इतकं सोपं नाही. यासाठी तुम्हाला आर्थिक शिस्त लावून घेणं आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत परंतु बहुतेक लोक त्यांचे पैसे अशा ठिकाणी गुंतवू इच्छितात जिथे त्यांची गुंतवणूक सुरक्षित असेल. जर तुम्हालाही तुमचे पैसे सुरक्षितपणे गुंतवून कोट्यधीश व्हायचं असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दरवर्षी गुंतवणूक करून ते करू शकता. आम्ही पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ योजनेबद्दल सांगत आहोत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना

पोस्ट ऑफिसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ योजना ही एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षे आहे परंतु तो प्रत्येकी ५ वर्षांसाठी दोनदा तो वाढवता येतो. लोक या योजनेत फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. वार्षिक गुंतवणूक मर्यादा १.५० लाख रुपये आहे. पीपीएफ योजना ७.१ टक्के परतावा देते. या योजनेत चक्रवाढीचा फायदा देखील मिळतो.

आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका

पीपीएफ योजनेद्वारे कोट्याधीश कसे व्हाल?

पीपीएफ योजनेत करोडपती होण्यासाठी, १५ वर्षे गुंतवणूक केल्यानंतर, तुम्हाला तुमचे पीपीएफ खाते ५ वर्षांसाठी दोनदा वाढवावं लागेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही संपूर्ण २५ वर्षांसाठी दरवर्षी १.५० लाख रुपये गुंतवले तर तुम्ही एकूण ३७.५० लाख रुपये गुंतवाल. २५ वर्षांनंतर, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १.०३ कोटी रुपयांचा निधी मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला येथे ६५.५८ लाख रुपयांचा नफा मिळेल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पीपीएफगुंतवणूकपैसा