TV Price Hike: तुम्ही नवीन टीव्ही (TV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, तुमची टीव्ही खरेदीचा तुमचा प्लॅन पुढे ढकलणं महाग पडू शकतं. जानेवारी २०२६ पासून टीव्हीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, टीव्हीच्या किमती ३ ते ४ टक्क्यांनी वाढू शकतात. या दरवाढीमागील दोन प्रमुख कारणं कोणती, हे जाणून घेऊया.
टीव्हीच्या किमतीवर दुहेरी परिणाम
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार टीव्हीच्या किमतीवर दुहेरी परिणाम होणार असून, जानेवारीपासून दरांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची वाढ होऊ शकते.
मेमरी चिप्सची कमतरता: टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरी चिप्सची (Memory Chips) कमतरता हे पहिलं मोठं कारण आहे.
रुपयाचे अवमूल्यन: भारतीय रुपयाचे अवमूल्यन (Indian Rupee Fall) हे दुसरं कारण आहे. भारतीय चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९० च्या खाली व्यवहार करत आहे. सोमवारी रुपया ९०.६३ वर घसरला होता, ज्यामुळे भारतीय टीव्ही उद्योगाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रुपयाची घसरण कशी ठरतेय समस्या?
भारतीय रुपयाची घसरण टीव्ही उद्योगाला कशी प्रभावित करते? याचं कारण म्हणजे, एलईडी टीव्हीमध्ये (LED TV) देशांतर्गत व्हॅल्यू ॲडिशन केवळ ३० टक्क्यांच्या आसपास आहे. ओपन सेल, सेमीकंडक्टर चिप्स आणि मदरबोर्ड यांसारखे मोठे भाग आयात केले जातात. रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे या भागांच्या आयातीसाठी उत्पादकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
चिप्सच्या संकटानं वाढवली चिंता
एकीकडे रुपयाच्या घसरणीमुळे टीव्ही उद्योगाला संकाटांचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे टीव्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेमरी चिप्सची कमतरता आणि वाढत्या किमतीनं ही समस्या वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची उपलब्धता कमी झाल्यामुळे चिप्सच्या किमती वाढत आहेत. अहवालानुसार, एआय सर्व्हरसाठी (AI Server) असलेल्या हाय-बँडविड्थ मेमरीच्या (HBM) प्रचंड मागणीमुळे जगभरात याची मोठी कमतरता जाणवत आहे. यामुळे सर्व प्रकारच्या मेमरीच्या किमती वाढत आहेत. चिप उत्पादक जास्त नफा देणाऱ्या एआय चिप्सवर लक्ष केंद्रित करत असल्याने टीव्हीसारख्या जुन्या उपकरणांचा पुरवठा कमी होत आहे.
तीन महिन्यांत चिप्स ५००% महाग
पीटीआयच्या अहवालात हायर अप्लायन्सेस इंडियाचे चेअरमन एनएस सतीश यांच्या हवाल्यानं म्हटलंय की, मेमरी चिप्सचं संकट आणि रुपयातील घसरण यामुळे एलईडी टीव्हीच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. काही टीव्ही उत्पादकांनी या दरवाढीबद्दल त्यांच्या डीलर्सना आधीच माहिती दिलीआहे.
थॉमसन, कोडॅक आणि Blaupunkt यांसारख्या ग्लोबल ब्रँड्सचे परवानाधारक असलेल्या सुपर प्लॅस्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडनं सांगितलं की, गेल्या तीन महिन्यांत मेमरी चिप्सच्या किमतीत ५०० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सीईओ अवनीत सिंह मारवाह यांनी तर जानेवारीपासून टीव्हीच्या किमतीत ७ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Web Summary : TV prices may increase by 3-4% from January 2026 due to memory chip shortages and the depreciating rupee. The falling rupee makes imported components expensive, while AI server demand drives up chip costs, potentially increasing prices further.
Web Summary : जनवरी 2026 से टीवी की कीमतें 3-4% तक बढ़ सकती हैं, जिसका कारण मेमोरी चिप की कमी और रुपये का मूल्यह्रास है। रुपये के गिरने से आयातित घटक महंगे हो जाते हैं, जबकि एआई सर्वर की मांग चिप की लागत को बढ़ाती है, जिससे कीमतें और बढ़ने की आशंका है।