Elon Musk Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यातील आरोप प्रत्यारोपांवर आता काही अंशी ब्रेक लागताना दिसत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे जुने मित्र इलॉन मस्क यांच्याबद्दलची आपली भूमिका नरम केली आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच आपण मस्क यांच्या कंपनीला फंडिंग करणं थांबवणार असंही म्हटलं. याशिवाय त्यांनी मस्क यांना नुकसान पोहोचवण्याचा कोणताही हेतू नसल्याचंही स्पष्ट केलं.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की त्यांना मस्कच्या कंपन्यांना नुकसान पोहोचवायचं नाही. तर, त्यांना आणि देशातील सर्व कंपन्यांची भरभराट होताना पहायचे आहे. ट्रम्प यांनी लिहिलंय.
नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
"मी पूर्णपणे केलं नाही तरी काहीशा प्रमाणात मस्क यांच्या कंपन्यांना धक्का देईन, अमेरिकन सरकारकडून त्यांना मोठ्या प्रमाणात मिळणारं अनुदान काढून घेईन असं अनेक जण म्हणत आहेत. पण तसं काही नाही. मला इलॉन मस्क आणि आपल्या देशातील सर्व व्यवसायांची पूर्वीपेक्षा भरभराट व्हावी अशी इच्छा आहे," असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेचा विकास हा देशाच्या व्यवसायांच्या विकासावर अवलंबून आहे आणि याचा फायदा संपूर्ण देशाला होईल, असंही त्यांनी नमूद केलंय.
वन बिग ब्युटीफुल बिल' वरून वाददोघांमधील तणावाचं सर्वात मोठं कारण ट्रम्प यांचा नवीन कायदा "वन बिग ब्युटीफुल बिल" आहे. हे विधेयक ४ जुलै रोजी मंजूर झालं. मस्क यांनी या विधेयकावर जोरदार टीका केली होती. विधेयकात समाविष्ट केलेल्या प्रचंड खर्च आणि कर धोरणांबद्दल ट्रम्प यांना फटकारण्यात आलं. या कायद्यामुळे पुढील दहा वर्षांत अमेरिकेचं कर्ज ३.३ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकतं, असं त्यांचं म्हणणं होतं. हे महत्त्वाचं मानलं जात होतं कारण मस्क स्वतः ट्रम्प सरकारमध्ये खर्च कमी करणाऱ्या DOGE या विभागाचे प्रभारी होते. आता ट्रम्प यांच्या मवाळ भूमिकेवरून, दोघांमधील संबंध सामान्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं दिसून येत आहे.