Join us

जगातील श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर; अदानी कुठे आहेत? पहिल्या क्रमांकावर कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:55 IST

Hurun Global Rich List 2025 : शेअर मार्केट घसरणीचा फटका उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील बसला आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीतून ते बाहेर पडले आहेत.

Hurun Global Rich List 2025: ऑक्टोबर २०२४ पासून मार्च २०२५ पर्यंत भारतीय शेअर बाजारात घसरणीचे तुफान आलं होतं. यात स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांसह दिग्गज कंपन्यांचे शेअर भुईसपाट झाल्याचे पाहायला मिळाले. यात गुंतवणूकदारांसोबत उद्योगपतींचेही प्रचंड नुकसान झाले. उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांचेही कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्जात वाढ झाल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. यामुळे ते जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या यादीनुसार टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती तब्बल १८९ डॉलर अब्जने वाढून ४२०बिलियन डॉलरवर पोहोचली.

रोशनी नाडर महिलांमध्ये पाचव्या क्रमांकावरकाही दिवसांपूर्वीच एचसीएल कंपनीच्या प्रमुख पदावर विराजमान झालेल्या रोशनी नादर जगातील पाचवी सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. ज्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ३.५ लाख कोटी रुपये आहे. जगातील पहिल्या १० श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आहे. त्यांचे वडील शिव नादर यांनी अलीकडेच एचसीएलमधील ४७% हिस्सा आपल्या मुलीच्या नावावर केला होता.

अंबानी अजूनही आशियातील सर्वात श्रीमंतयादीनुसार, मुकेश अंबानी जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले असले तरी ते अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीनुसार, रिलायन्स समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत घट झाली आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीजला त्यांच्या ऊर्जा आणि किरकोळ व्यवसायांनी अपेक्षित काम केले नाही. मंद विक्री वाढ आणि कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंतेमुळे समूहाच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. कंपनीने डिजिटल प्लॅटफॉर्म, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि किरकोळ व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत.

वाचा - अनिल अंबानींच्या कंपनीच्या 'या' स्टॉकमध्ये ११% मोठी तेजी, परंतु आताही ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तराहून खालीच

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावरभारतातील सर्वात श्रीमंत लोकांबद्दल बोलायचे तर, गौतम अदानी हे हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५ मध्ये मुकेश अंबानींच्या नंतर आहेत. गेल्या एका वर्षात त्यांची एकूण संपत्ती सुमारे १ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. अदानी यांनी अल्पावधीत आपले साम्राज्य निर्माण केले आहे. अदानी समूह देशातील बंदरे, वीज निर्मिती, विमानतळ, खाणकाम, अक्षय ऊर्जा, मीडिया आणि सिमेंट या क्षेत्रातील व्यवसायात गुंतलेला आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानीगौतम अदानीशेअर बाजारशेअर बाजार