Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा भूकंप; एका झटक्यात २७,८८४ रुपयांनी स्वस्त झालं Silver, काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:45 IST

Gold Silver Rate Today: ५ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.

Gold Silver Rate Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियावर (MCX) ५ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केट (COMEX) वर सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसत होती, परंतु अल्पावधीतच या तेजीचं रूपांतर मोठ्या घसरणीत झालं. सोन्याचा भाव ५,०२१.४० डॉलर प्रति औन्सवरून ४,८७१.६० डॉलरवर आला आहे, तर चांदी ८८.९६५ डॉलर प्रति औन्सवरून ७५.३८५ डॉलरपर्यंत घसरली आहे.

चांदीच्या दरात २७,८८४ रुपयांची मोठी घसरण

आज चांदीच्या किमतीत सर्वाधिक घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी MCX वर चांदी २,७०,५४९ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, मात्र आज गुरुवारची सुरुवात नकारात्मक झाली. बाजार उघडताच चांदीमध्ये प्रथम ६% घसरण दिसली, जी नंतर ९% पर्यंत वाढली. चेन्नईमध्ये दोन दिवसांच्या तेजीनंतर ३ लाख रुपयांच्या पार गेलेली चांदी आता २,४४,६६५ रुपये प्रति किलोवर आली आहे.

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांनी घसरला; Hindalco-Indigo टॉप लूझर 

सोन्याच्या किमतीतही घसरण

केवळ चांदीच नाही, तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. चांदीच्या तुलनेत सोन्यातील घसरण कमी आहे. MCX वर बाजार उघडताच सोन्याच्या दरात २% हून अधिक घट झाली होती, मात्र सकाळी ९:३० वाजेपर्यंत सोनं १.१९% च्या घसरणीसह १,५१,२३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. बुधवारी MCX वर सोन्याचा भाव १,५३,३९० रुपयांवर बंद झाला होता.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

दिल्ली: २४ कॅरेट सोनं १,५४,५७० रुपये आणि २२ कॅरेट सोनं १,४१,७०० रुपये प्रति १० ग्रॅम.मुंबई: २४ कॅरेट सोनं १,५४,४२० रुपये, २२ कॅरेट १,४१,५५० रुपये आणि १८ कॅरेट १,१५,८२० रुपये प्रति १० ग्रॅम.चेन्नई: २४ कॅरेट सोनं १,५६,२२० रुपये, २२ कॅरेट १,४३,२०० रुपये आणि १८ कॅरेट १,२२,५०० रुपये प्रति १० ग्रॅम.कोलकाता: २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५४,४२० रुपये प्रति १० ग्रॅम.

चांदीचे आजचे दर

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे एक किलो चांदीची किंमत २,४६,६६५ रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा भाव २,६०,००० रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Plunge: Silver Drops Sharply by ₹27,884

Web Summary : Gold and silver prices witnessed a significant drop. Silver prices fell sharply, reaching ₹2,44,665 per kg in Chennai. Gold also saw a decrease, with MCX recording ₹1,51,230 per 10 grams. Price variations exist across major cities like Delhi, Mumbai, and Kolkata.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक