Join us
Daily Top 2Weekly Top 5

पैसा येणार कसा, कुठून अन् किती; तुम्ही तुमचं 'बजेट' कधी तयार केलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:47 IST

Family Budget: देशाचं बजेट येऊ घातलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र त्याची चर्चा आहे. देश चालवायला जसा पैसा लागतो, तसंच आपलं कुटुंब चालवण्यासाठीही पैसा लागतो.

Family Budget: देशाचं बजेट येऊ घातलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र त्याची चर्चा आहे. देश चालवायला जसा पैसा लागतो, तसंच आपलं कुटुंब चालवण्यासाठीही पैसा लागतो. तो येतो म्हणजे आपली कमाई अन् कुटुंबासाठी आपण देतो तो खर्च.. यातून उरते ती बचत... पण हे देशाच्या बेजटसारखंच नियोजनबद्ध केलं तर... याचा कधी विचार केला आहे का?  आजच्या महागाईच्या काळात बजेटची गरज का आहे, याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

खर्चावर नियंत्रण आणि शिस्त

बजेटमुळे आपल्याला आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा नेमका मागोवा घेता येतो. अनेकदा आपण लहान-सहान गोष्टींवर विनाकारण खर्च करतो, जो महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम बनतो. बजेटमुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवता येते आणि पैशांचा अपव्यय थांबतो.

आर्थिक उद्दिष्टं गाठणं

प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. स्वतःचे घर, मुलांचे उच्च शिक्षण किंवा परदेशवारी अशा आकांक्षा उराशी आपण बाळगून असतो. बजेटशिवाय ही स्वप्नं केवळ इच्छा राहतात. जेव्हा तुम्ही बजेट तयार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयानुसार पैसे बाजूला काढता. आर्थिक नियोजनामुळे तुम्ही भविष्यातील मोठ्या खर्चासाठी आर्थिकदृष्ट्यातयार असता.

आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज

अचानक उद्भवणारे आजारपण, नोकरी जाणं, अपघाती खर्च यांमुळे आर्थिक गणित कोलमडू शकतं. बजेटमध्ये 'इमर्जन्सी फंड'साठी विशेष तरतूद केल्यामुळे अशा संकटकाळात तुम्हाला कोणाकडेही हात पसरण्याची गरज लागत नाही. तुमचे पैसे नियोजित असतात, तेव्हा पैशांच्या चिंतेमुळे होणारा ताणही कमी होतो.

तक्ता कसा वापरावा?

अपेक्षित रक्कम : महिन्याच्या सुरुवातीला कोणत्या गोष्टीवर किती खर्च करायचा आहे, त्याचा अंदाज येथे लिहा. प्रत्यक्ष खर्च : महिन्याच्या शेवटी खरोखर किती पैसे खर्च झाले, ती रक्कम येथे भरा. फरक : जर तुमचा खर्च अंदाजापेक्षा जास्त झाला असेल, तर तो पुढील महिन्यात कमी करण्याचा प्रयत्न करा. हा तक्ता दर महिन्याला अपडेट केल्यास तुम्हाला तुमचे पैसे कुठे जात आहेत, हे स्पष्टपणे समजेल.

कसं तयार करायचं बजेट? ५ पॉइंटमधून समजून घ्या...

उत्पन्नाचं अचूक विश्लेषण असे करा १. निव्वळ उत्पन्न, उत्पन्नाचे इतर स्रोत समाविष्ट करा.२. खर्चाचा मागोवा घ्या आणि वर्गीकरण करा ३. अत्यावश्यक खर्चासाठी प्रथम निधी वेगळा काढा.४. रोजच्या जगण्यासाठी, कर्ज ईएमआयसाठी पैसे.५. उर्वरित २० टक्क रक्कम बचत, गुंतवणुकीसाठी.

English
हिंदी सारांश
Web Title : Budgeting: Know your income, expenses, savings for financial stability.

Web Summary : Like national budgets, families need budgets to control expenses, achieve goals, and prepare for emergencies. Track income, categorize spending, and allocate funds wisely for savings and investments.
टॅग्स :पैसागुंतवणूकअर्थसंकल्प २०२६