Join us

तुमचे आधार कार्ड हरवले? फक्त ५० रुपयांत मोबाईलवरुन घरबसल्या मागवा, 'या' स्टेप्स करा फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:01 IST

Aadhaar Card Lost: आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त ५० रुपयांत तुम्ही घरबसल्या मागवू शकता.

How to get new Aadhar Card : आजच्या काळात सरकारी असो की खाजगी क्षेत्रात आधार कार्डशिवाय तुमचं पानही हलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. बँक खाते उघडण्यापासून ते मोबाईल क्रमांक अपडेट करण्यापर्यंत, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी त्याची गरज पडते. पण जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले? तर अनेकांना ते पुन्हा कसं मिळवायचं? याचं टेन्शन असतं. पण, काळजी करू नका. केवळ ५० रुपयांत तुम्ही ते घरबसल्या मागवू शकता.

UIDAI ने सोपी केली डाउनलोड प्रक्रियायुनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्ड पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. तुम्ही घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून मिनिटांत ई-आधार डाउनलोड करू शकता.

असे डाउनलोड करा ई-आधार

  • सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईट https://eaadhaar.uidai.gov.in](https://eaadhaar.uidai.gov.in) वर जा.
  • तेथे तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन पर्याय दिसतील- १२ अंकी आधार क्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी.
  • यापैकी कोणताही एक पर्याय निवडा, आपली माहिती भरा आणि इमेजमधील कॅरेक्टर्स (CAPTCHA) टाइप करा.
  • आता "Send OTP" वर क्लिक करा. हा ओटीपी (OTP) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर येईल.
  • ओटीपी टाकल्यावर तुम्ही तुमचे आधार कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता.

वाचा - PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार

घरी मागवा आधार कार्डची प्रिंटेड प्रतजर तुम्हाला आधार कार्डची हार्ड कॉपी हवी असेल, तर UIDAI त्यासाठीही सोपा पर्याय देते. तुम्ही त्याची प्रिंटेड प्रत थेट तुमच्या घरी मागवू शकता.

  • त्यासाठी uidai.gov.in या वेबसाईटवर जा.
  • "My Aadhaar" सेक्शनमध्ये "Retrieve Lost or Forgotten EID/UID" वर क्लिक करा.
  • मागितलेली माहिती (आधार क्रमांक, नाव, मोबाईल क्रमांक किंवा ईमेल) भरा.
  • आता "Send OTP" किंवा "Send TOTP" निवडा आणि माहिती तपासणी करा.
  • यानंतर तुम्हाला ५० रुपयांचे शुल्क ऑनलाईन पेमेंट करावे लागेल.
  • पेमेंट पूर्ण झाल्यावर पुढील १५ दिवसांत तुमचे आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे  तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.
टॅग्स :आधार कार्डऑनलाइनसरकार