Join us

लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:44 IST

Aadhar Card : लग्नानंतर अनेकदा महिला त्यांचे आडनाव बदलतात. अशा परिस्थितीत, महिलांनी आधार कार्डमध्ये त्यांचे नाव अपडेट करणे महत्वाचे आहे.

Aadhar Card : भारत सरकारने जारी केलेले आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. अगदी लहानसहान कामांपासून ते मोठ्या सरकारी कामांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर होतो. त्यामुळे आधार कार्डवरील सर्व माहिती अचूक आणि योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा महिला लग्नानंतर आपले आडनाव बदलतात, अशावेळी आधार कार्डवरील नाव अपडेट करणे आवश्यक असते. आज आपण लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलू शकता, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

नाव बदलण्यापूर्वी हे लक्षात ठेवासर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव केवळ दोन वेळाच बदलू शकता. त्यामुळे नाव भरताना काळजी घ्या. लग्नानंतर आधार कार्डवरील नाव तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे बदलू शकता. या दोन्ही प्रक्रियांसाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

ऑनलाइन प्रक्रिया

  • सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट [https://uidai.gov.in/](https://uidai.gov.in/) वर जा.
  • 'My Aadhaar' या सेक्शनमध्ये जाऊन 'Update Demographics Data' वर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर आलेल्या ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा.
  • नाव बदलण्यासाठी 'Name' या पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे नवीन नाव काळजीपूर्वक भरा.
  • पुराव्यासाठी विवाह प्रमाणपत्र आणि पतीचे आधार कार्ड अपलोड करा.
  • अपडेटसाठी ५० रुपये शुल्क भरा. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरील नाव अपडेट होईल.

वाचा - जिओचा आयपीओ कधी येईल? रिलायन्सच्या वार्षिक बैठकीत मुकेश अंबानी यांनी सांगितली तारीख

ऑफलाइन प्रक्रिया

  • तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्रात जा आणि आधार अपडेट फॉर्म भरा.
  • फॉर्ममध्ये तुमचे नवीन नाव आणि आवश्यक माहिती भरा. त्यानंतर फॉर्मसोबत विवाह प्रमाणपत्र जोडा.
  • ५० रुपये शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल. या पावतीवर एक URN नंबर असतो, ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासण्यासाठी करू शकता.
  • व्हेरिफिकेशननंतर तुमच्या आधार कार्डवरील तुमचे नवीन नाव ९० दिवसांच्या आत अपडेट होईल.
टॅग्स :आधार कार्डलग्नसरकार