Join us

'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:19 IST

Ration Card: आता तुम्ही रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Ration Card : देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम अन्नसुरक्षा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही! केंद्र सरकारने प्रक्रिया सोपी केली असून, आता तुम्ही सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या न चढता, घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.

यासाठी नागरिकांना 'उमंग ॲप' या सरकारी मोबाइल ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. पूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते, पण आता ही प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे.

रेशन कार्ड का आहे महत्त्वाचे?रेशन कार्ड हे केवळ स्वस्त दरात धान्य मिळवण्यासाठीच नाही, तर ते भारत सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे. यामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील (नाव, पत्ता) तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती असते. कुटुंबातील सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी हे कार्ड उपयोगी ठरते.

UMANG App वरून रेशन कार्डसाठी असा करा अर्ज

  • सर्वात आधी तुमच्या मोबाइलमध्ये UMANG ॲप डाउनलोड करा.
  • तुमच्या मोबाइल नंबरचा वापर करून ॲपवर नोंदणी करा.
  • होम पेज उघडल्यानंतर 'Services' विभागात जा.
  • 'Utility Services' मध्ये 'रेशन कार्ड संबंधित' पर्याय शोधा.
  • Apply Ration Card वर क्लिक करा.
  • तुमचे राज्य निवडा आणि आवश्यक माहिती भरा. यात तुमचे वैयक्तिक तपशील (नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख) आणि पत्ता भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि Submit बटणावर क्लिक करा.
  • 'या' राज्यांमधील लोकांनी नोंद घ्यावी

वाचा - एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

सध्या UMANG ॲपद्वारे रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा मोजक्याच राज्यांमध्ये उपलब्ध आहे. यात प्रामुख्याने चंदीगड, लडाख आणि दादरा व नगर हवेली यांचा समावेश आहे. या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकच सध्या अर्ज करू शकतात. लवकरच, ही सुविधा देशातील अधिकाधिक राज्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे लाखो नागरिकांना घरी बसून रेशन कार्ड काढणे शक्य होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांनाही ही सेवा उपलब्ध होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Apply for Ration Card Online via UMANG App in Select States

Web Summary : Apply for a ration card online using the UMANG app, simplifying the process. Currently available in Chandigarh, Ladakh, and Dadra & Nagar Haveli, this initiative aims to extend access to more states, benefiting numerous citizens seeking convenient access to essential government services.
टॅग्स :सरकारी योजनामोबाइलऑनलाइनअन्न