PAN Card : आर्थिक व्यवहारांसाठी 'पॅन कार्ड' हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. प्राप्तिकर विभागातर्फे दिला जाणारा हा १० अंकी कोड व्यक्तींसह कंपन्या आणि भागीदारी संस्थांसाठीही अनिवार्य असतो. नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सुटसुटीत झाली असून, तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही मार्गांनी अर्ज करू शकता.
पॅन कार्डसाठी 'ऑनलाईन' अर्ज कसा करावा?
- तुम्ही NSDL किंवा UTIITSL च्या अधिकृत वेबसाइटवरून खालीलप्रमाणे अर्ज करू शकता.
- सर्वात आधी अधिकृत पोर्टलवर जाऊन 'New PAN' हा पर्याय निवडा.
- भारतीय नागरिकांनी 'फॉर्म ४९-ए' तर परदेशी नागरिकांनी 'फॉर्म ४९-एए' भरावा.
- नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी ही वैयक्तिक माहिती काळजीपूर्वक भरा.
- त्यानंतर डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे प्रोसेसिंग फी जमा करा.
- शुल्क भरल्यावर तुम्हाला १५ अंकी 'अक्नॉलेजमेंट नंबर' मिळेल, ज्याद्वारे तुम्ही अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.
- आधार OTP द्वारे ई-साइन करा. जर ई-साइन शक्य नसेल, तर अर्जाची प्रिंट काढून कागदपत्रांसह ती १५ दिवसांच्या आत पॅन कार्यालयात कूरियरने पाठवा.
- साधारणपणे १५ कामकाजाच्या दिवसांत तुमचे फिजिकल पॅन कार्ड अर्जात दिलेल्या पत्त्यावर पोहोचते.
'ऑफलाईन' अर्जाची पद्धतज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, ते जिल्हा स्तरावरील पॅन एजन्सी किंवा NSDL कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी वेबसाइटवरून फॉर्म ४९-ए डाऊनलोड करून तो भरावा लागेल. त्यासोबत ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि फोटो जोडून निर्धारित शुल्कासह जमा करावा लागेल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रेओळखीचा पुरावा (कोणतेही एक)आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, फोटो असलेले पेन्शनर कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र.
पत्त्याचा पुरावा (कोणतेही एक):वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, गॅस कनेक्शन बुक, बँक खाते स्टेटमेंट, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट किंवा आधार कार्ड.
जन्मतारखेचा पुरावा (कोणतेही एक):जन्म दाखला, १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र.
पॅन कार्ड हा एक युनिक नंबर असून तो संगणकाद्वारे जनरेट केला जातो. एकदा जारी केलेले पॅन कार्ड आयुष्यभरासाठी वैध असते. प्राप्तिकर परतावा भरताना किंवा मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड असणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
Web Summary : Apply for a PAN card online or offline. Online requires NSDL/UTIITSL portal, Form 49-A/49-AA, fee payment, and document submission. Offline involves form download, submission at a PAN agency with documents and fees. PAN is essential for financial transactions.
Web Summary : पैन कार्ड के लिए ऑनलाइन या ऑफलाइन आवेदन करें। ऑनलाइन के लिए NSDL/UTIITSL पोर्टल, फॉर्म 49-A/49-AA, शुल्क भुगतान और दस्तावेज़ जमा करना आवश्यक है। ऑफलाइन में फॉर्म डाउनलोड करना, दस्तावेज़ों और शुल्क के साथ पैन एजेंसी में जमा करना शामिल है। पैन वित्तीय लेनदेन के लिए आवश्यक है।