Join us

‘जेवढ्यास तेवढा’ टॅक्सनं भारताचं नुकसान किती? २ एप्रिलपासून अमेरिका भारतावर लावणार कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:59 IST

२ एप्रिलपासून अमेरिका भारतावर जेवढ्यास तेवढा कर आकारणार आहे. टॅरिफ हा दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर लादलेला कर असतो.

२ एप्रिलपासून अमेरिका भारतावर जेवढ्यास तेवढा कर आकारणार आहे. टॅरिफ हा दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर लादलेला कर असतो. भारतातील कृषी आणि अन्नधान्य निर्यातीवर टॅक्सचा सर्वाधिक परिणाम होईल. टेस्लाचा सायबर ट्रक अमेरिकेत जवळपास ९० लाख रुपयांना विकला जात असेल आणि टॅरिफ १०० टक्के असेल तर भारतात या ट्रकची किंमत जवळपास २ कोटी असेल.

अमेरिकेकडून भारत काय खरेदी करतो?

उत्पादनकिंमतटॅरिफ
पेट्रोलियम क्रूड९.५१७.५%
सोने४.२२२०%
पेट्रोलियम प्रोडक्ट२.७९७.५%
इलेक्ट्रॉनिक्स२.३३२.५  
कोळसा२.१०५%

भारत अमेरिकेला काय विकतो?

उत्पादनकिंमतटॅरिफ
पेट्रोलियम४.३१०.७५%
औषधे १.३९०.७५%
दूरसंचार उपकरणं१.४६०%
मोती,महाग दगड०.९९०%
इलेक्ट्रॉनिक मशीन०.९२०%

भारतावर काय परिणाम?

यामुळे निर्यात महाग होईल, भारताचा व्यापार फायदा कमी होईल, अमेरिकी वस्तू भारतात अधिक येऊ शकतात. तसंच रुपया आणखी घसरू शकतो आणि विदेशी गुंतवणूक वाढेल. इतकंच काय तर यामुळे भारताचं प्रत्येक वर्षी ६१ हजार कोटींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.

टॅरिफ वाढल्यानं कंपन्यांचा खर्च वाढणार आहे. तसंच कंपन्या या वाढत्या खर्चाची वसुली ही वस्तूंच्या किमती वाढवून करणार आहेत. तसेच टॅरिफमुळे अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तर त्याचा फटका अमेरिकेतील नागरिकांनाही बसणार असून, त्यांना या वस्तू चढ्या दरानं खरेदी कराव्या लागतील. भारत अमेरिकेमध्ये ज्या वस्तूंची निर्यात करतो त्यामध्ये प्रामुख्याने मखाना, गोठवलेली कोळंबी, मसाले, बासमती तांदूळ, काजू, फळे, भाज्या, तेल, स्वीटनर, प्रक्रिया केलेली साखर, मेवा, धान्य, पेट्रोलियम, कच्चे हिरे, एलपीजी, सोनं, कोळसा, बदाम, संरक्षण सामुग्री, इंजिनियरिंची अवजारे, इलेक्ट्रॉनिक सामान, औषधं, आदींचा समावेश आहे. आता अमेरिकेनं टॅरिफ वाढवल्यास या वस्तू अमेरिकेक महाग होतील, अमेरिका हा बासमती तांदूळांचा मोठा ग्राहक आहे. त्यामुळे बासमती तांदूळही अमेरिकेत महाग होईल. मात्र अमेरिकेने टॅरिफ वाढवल्याचा भारताच्या निर्यातीवरही प्रतिकूल परिणाम होणार आहे. 

स्पर्धा करणं कठीण

त्याशिवाय टॅरिफ वाढवल्यानं भारतीय ज्वेलरी ब्रँड्ससाठी अमेरिकेमध्ये स्पर्धा करणं कठीण होणार आहे. अमेरिकेत मागणी असलेल्या भारतीय साड्या आणि कुर्ते टॅरिफ वाढल्यानं महाग होऊ शकतात. भारतीय कंपन्यांसाठी अमेरिकेमध्ये व्यापार करणं महाग पडू शकतं. भारत आणि अमेरिकेच्या व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. टॅरिफ वाढल्यानं भारतातून निर्यात होणाऱ्या अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार तोट्यात जाऊन त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवही विपरित परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदी