Join us

AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:35 IST

Artificial intelligence : एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे भविष्यात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Artificial intelligence : तुमच्याही कानावर एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स हे नाव कधी ना कधी नक्कीच पडलं असेल. हातातल्या मोबाईलपासून रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांपर्यंत बहुसंख्य क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. एआयमुळे भविष्यात अनेक क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहे. विशेषकरुन आयटी क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसेल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या एआय युनिटचे जागतिक प्रमुख अशोक कृष यांनी आपलं मत मांडलं आहे.

कृष म्हणाले की, एआय नवीन तंत्रज्ञानाच्या निर्मितीला प्रोत्साहन देईल. यामुळे कामाचे स्वरूप बदलू शकते. एआयकडे कौशल्य परिवर्तनासाठी उत्प्रेरक म्हणून पाहिले पाहिजे, नोकऱ्यांसाठी धोका म्हणून नाही. पीटीआयला दिलेल्या एका खास मुलाखतीत कृष म्हणाले की, एआय हा केवळ तांत्रिक बदल नाही तर एक सांस्कृतिक बदल आहे, ज्यासाठी लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत आणि त्यांच्या अंमलबजावणीत बदल आवश्यक आहेत.

एआयमुळे नोकऱ्यांना किती धोका?गेल्या तीन दशकांमध्ये मेनफ्रेम्सपासून ते इंटरनेट, ई-कॉमर्स, डिजिटल आणि क्लाउडपर्यंत अनेक नवीन तंत्रज्ञानाच्या लाटा आल्या आहेत. प्रत्येक नवीन बदलांसोबत भविष्यातील शक्यता आणि भीती निर्माण झालेली आहे. जेव्हा संगणक पहिल्यांदा बाजारात आला. त्यावेळीही अशीच भीती निर्माण झाली होती. पण, संगणकाने कामाचे स्वरुप बदलले. त्यासोबत रोजगाराच्या असंख्या संधीही निर्माण झाल्या. ते म्हणाले की एआय ही विकासाची पुढची पिढी आहे. जे पुढील तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत करेल.

वाचा - इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?

कौशल्य विकासासाठी एआय ही एक उत्तम संधीअशोक कृष म्हणाले, "म्हणूनच, मला वाटते की कृत्रिम बुद्धिमत्तेकडे नोकरी गमावण्याच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. उलट कौशल्य विकासासाठी ही एक उत्तम संधी आहे." ते म्हणाले की एआयमुळे सध्याच्या तंत्रज्ञानाचा विस्तार होईल. परंतु, त्याद्वारे होणाऱ्या कामाचे स्वरूप वेगळे असेल.

टॅग्स :आर्टिफिशिअल इंटेलिजन्सटाटामाहिती तंत्रज्ञानइन्फोसिस