Join us

पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:58 IST

Post Office Saving Schemes: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या ग्राहकांना पूर्वीइतकेच व्याज देत आहे.

Post Office Saving Schemes: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी एफडीच्या व्याजदरात कपात केली आहे. मात्र, पोस्ट ऑफिस अजूनही आपल्या ग्राहकांना पूर्वीइतकेच व्याज देत आहे. रेपो दरात कपात केल्यानंतरही पोस्ट ऑफिसनं बचत योजनांच्या व्याजदरात कपात केलेली नाही. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेवर ६.९ टक्के ते ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. पोस्ट ऑफिस टीडी स्कीम बँकांच्या एफडी स्कीमसारखीच आहे, ज्यामध्ये ठराविक कालावधीनंतर फिक्स्ड रिटर्न मिळतो.

२ वर्षांच्या टीडीवर ७.०% व्याजपोस्ट ऑफिस १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत सर्वसामान्य नागरिक असो वा ज्येष्ठ नागरिक, मग तो पुरुष असो वा महिला, सर्व ग्राहकांना समान व्याज मिळतं. आज आपण येथे जाणून घेणार आहोत की जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये १ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील.

किती मिळेल परतावा?

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना २ वर्षांच्या टीडीवर ७ टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर या योजनेत १ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुमच्या पत्नीच्या खात्यावर एकूण १,१४,८८८ रुपये मिळतील. या रकमेत आपण जमा केलेल्या १,००,००० रुपयांव्यतिरिक्त १४,८८८ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजना पूर्णपणे सुरक्षित असून त्यात जमा होणारा प्रत्येक पैसा केंद्र सरकारच्या देखरेखीखाली राहतो.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक