waqf board property : संसदेच्या दोन्ही सभागृहात २ दिवसांच्या वादळी चर्चेनंतर शुक्रवारी सकाळी संसदेने वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवले जाईल, जेणेकरून त्याचे कायद्यात रुपांतर होईल. देशभरात वक्फ बोर्डाकडे कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. तर वक्फची मालमत्ती हडप करण्याचा डाव सरकाराचा असल्याचा आरोप विरोधकांनी केली. प्रत्यक्षात वक्फ बोर्डाकडे कोणत्या राज्यात किती मालमत्ता आहे? हे तुम्हाला माहित आहे का? सर्वाधिक जमीन कोणत्या राज्यात आहे? हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
वक्फचा इतिहास काय आहे?वक्फची मालमत्ता पाहण्याअगोदर या बोर्डाचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारत सरकारच्या वक्फ बोर्ड वेबसाईटनुसार, वक्फ शब्दाची निर्मिती अरब जगतातील वकुफा शब्दापासून झाली ज्याचा अर्थ पकडणे, बांधणे अथवा ताब्यात घेणे. इस्लामिक मान्यतेनुसार कुठलाही व्यक्ती त्याच्या धर्मामुळे किंवा अल्लाहला भेट देण्याच्या हेतूने त्याची संपत्ती दान करत असेल तर त्याला वक्फ म्हटलं जाते. इस्लाम धर्माच्या आधारे दान केलेली संपत्ती वक्फ असते. फक्त, या मालमत्तेतून येणारे उत्पन्न मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी वापरावे, ही एकमेव अट आहे. स्वतंत्र भारतात सर्वात आधी पहिल्या संसदेत १९५४ साली कायदा बनवला गेला. त्यात संशोधन झाले आणि १९९५ मध्ये नरसिम्हा राव सरकारने कायद्यात बदल केला. २०१३ साली मनमोहन सिंह सरकारने यात आणखी काही सुधारणा केल्या होत्या. यावरच भाजपचा आक्षेप होता.
देशातील वक्फ मालमत्तावक्फ मॅनेजमेंट सिस्टम इन इंडिया (WAMSI) पोर्टलच्या आकडेवारीनुसार १४ मार्च २०२५ पर्यंत, ३८ लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये ८.७२ लाख नोंदणीकृत वक्फ मालमत्ता आहेत. यापैकी ४.०२ लाख वापरकर्त्यांनी वक्फ केलेले आहेत. वास्तविक, केवळ ९,२७९ प्रकरणांचे मालकी दस्तऐवज अपलोड केले गेले आहेत. तर केवळ १,०८३ संबंधित वक्फ करार आहेत.
वाचा - सासू आणि सासरे यांच्या मालमत्तेवर सून दावा करू शकते का? काय सांगतो कायदा?
या राज्यांमध्ये वक्फ बोर्डाच्या सर्वाधिक मालमत्तादेशात उत्तर प्रदेश (सुन्नी) २.१७ लाख वक्फ मालमत्तांसह आघाडीवर आहे, प्रत्यक्षात एकूण क्षेत्रफळाची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यानंतर पश्चिम बंगाल (८०,४८० मालमत्ता), पंजाब (७५,९६५), तामिळनाडू (६६,०९२) आणि कर्नाटक (६२,८३०) यांचा क्रमांक लागतो. ३२ राज्यांमध्ये ८,७२,३२८ मालमत्ता आहेत, ज्यांचे एकूण क्षेत्र ३८,१६,२९१.७८८ एकर आहे. तर सर्वाधिक कमी दादरा आणि नगर हवेली वक्फ बोर्डकडे आहेत. येथे फक्त ३० मालमत्ता वक्फकडे आहेत.