नवी दिल्लीः भारतीयांना सोन्याचं बरंच अप्रूप आहे. लग्नसोहळ्यात तर जास्त करून सोन्याची खरेदी केली जाते. तसेच गुंतवणुकीसाठीही सोन्याचा विचार केला जातो. पण सोन्याची संबंधित कराच्या नियमांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. प्राप्तिकर विभागाला आपल्या घरात मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचा सुगावा लागल्यानंतर ते आपला माग काढतात आणि प्राप्तिकर विभागाची नोटीसही येते. त्यामुळे सोन्याच्या संबंधित नियम नक्कीच जाणून घेतले पाहिजेत. घरी सोनं ठेवण्याची मर्यादाघरी सोनं ठेवण्याची कोणतीही मर्यादा नाही. परंतु सोनं खरेदी करताना पक्क बिलं गरजेचं असतं, प्राप्तिकर विभागाच्या चौकशीमध्ये हे पक्कं बिल सहाय्यक सिद्ध होते. वर्षाला ज्याचं उत्पन्न 50 लाखांहून जास्त असतं, त्यानं घरात असलेल्या सोन्याची माहिती प्राप्तिकर परतावा भरताना द्यावी लागते. रिटर्न फाइल करताना स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या पर्यायांवर सोन्याची किंमत टाका. प्राप्तिकर विभागानं छापा मारल्यानंतर सोनं सापडल्यास ते ठेवण्याचीही एक ठरावीक काही मर्यादा आहे. लग्न झालेल्या महिलांना 500 ग्राम सोनं जवळ बाळगण्याची मुभा आहे. तर 250 ग्राम अविवाहित महिला आणि 100 ग्राम पुरुषांना सोनं बाळगण्याची सवलत आहे. सोन्याच्या विक्रीवर भांडवली नफा कर आकारला जातो. 3 वर्षांपूर्वीच खरेदी केलेलं सोनं विकल्यास अल्प मुदतीचा भांडवली नफा कर द्यावा लागतो. आणि 3 वर्षानंतर ते सोनं विकल्यास दीर्घकालीन भांडवली नफा कर द्यावा लागतो. त्यामुळे घेतलेल्या सोन्यावर 20 टक्क्यांपर्यंत टॅक्स आकारला जातो.
घरात किती तोळे सोनं ठेवता येतं?; नियम जाणून घेतल्यास होईल फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 16:32 IST