Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या देशातून किती किलो सोने आणता येते? परवानगी आहे तर मग पकडतात कशाला? जाणून घ्या नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 15:42 IST

Gold : भारतात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तरीही सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण बाहेरच्या काही देशात सोनं भारतापेक्षाही स्वस्त आहे.

Gold : भारतात सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आपल्याकडे सोन्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढतात. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दरात ५ ते ६ हजार रुपयांनी घट झाली आहे. डॉलरची  मजबुती आणि सराफा बाजारातील सततच्या घसरणीमुळे सोने स्वस्त झाले आहे. लोक या कराराचा फायदा घेऊन सोने खरेदी करतात. भारतात सोन्यावर मोठ्या प्रमाणात कर लावला जातो.

यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. पण, आपल्या देशापेक्षाही काही देशात सोन्याचे दर कमी आहेत. यामुळे लोक दुबईला सोने खरेदीसाठी जातात. सोन्यावर देशात कर नाही. किंवा भारताच्या तुलनेत इथे सोने खूपच स्वस्त मिळत आहे. 

ग्राहकांच्या एका चुकीने बँकांनी कमावले तब्बल ८५०० कोटी; सरकारने दिली माहिती

दुबईमध्ये सोनं कितीही स्वस्त असले तरी तुम्हाला सोनं हवं तेवढं भारतात आणू शकत नाही. यासाठी काही नियम आहेत.  नियमांनुसार कोणतीही व्यक्ती एक किलोपेक्षा जास्त सोने खरेदी करून दुबईहून भारतात आणू शकत नाही. ते आणलेलं सोनं विकायचे असेल तर ते नियमांच्या विरोधात आहे. आपल्याला ते सोनं विकता येत नाही. 

जर तुम्ही दुबईहून सोनं घरी आणत असाल तर सरकार त्यावर शुल्क आकारले जाते. भारतात आणलेल्या सोन्यावर किमान ३८ टक्के कस्टम ड्युटी भरावी लागते.

किती सोनं आणू शकतो?

जर तुम्हाला ड्युटीवरील कर वाचवायचा असेल तर रक्कम शुल्कमुक्त मर्यादेत ठेवा. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्‍ट अॅन्ड कस्‍टम्‍सनुसार, गेल्या एक वर्षापासून दुबईत वास्तव्यास असलेला पुरुष प्रवासी दुबईतून २० ग्रॅम सोनं खरेदी करून भारतात आणू शकतो. याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. तर महिला ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने खरेदी करून भारतात आणू शकतात. त्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.

याशिवाय दुबईमध्ये एक वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केलेली मुले दुबईतून करमुक्त सोन्याचे दागिने भारतात आणू शकतात. सोन्याची नाणी, बिस्किटे खरेदी करून घेऊन जाता येणार नाही. त्यांना फक्त सोन्याच्या स्वरूपात दागिने खरेदी करावे लागतील.

टॅग्स :सोनंचांदी