Join us
Daily Top 2Weekly Top 5

TCS मध्ये किती कर्मचारी काम करतात? फ्रेशर्स आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 14:32 IST

TCS Salary Srtucture: भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या Tata Consultancy Services (TCS) मध्ये ६ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत ...

TCS Salary Srtucture: भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या Tata Consultancy Services (TCS) मध्ये ६ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून, TCS ही जगातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांपैकी एक आहे. इतक्या मोठ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, या कंपनीतील वेतनरचना ही अनुभव, कौशल्य, लोकेशन आणि भूमिकेनुसार बदलते. 

फ्रेशर्सना किती पगार मिळतो?

TCS मध्ये नव्याने नोकरीला लागणाऱ्या उमेदवारांना साधारणतः ₹३.३ लाख ते ₹७ लाख वार्षिक (CTC) पॅकेज दिले जाते. यामध्ये Ninja कॅटेगरी : ₹३.३ ते ₹३.६ लाख वार्षिक आणि Digital/Prime कॅटेगरी : ₹७ ते ₹९ लाख वार्षिक असे दोन भाग आहेत.

एंट्री लेव्हल सॅलरी

TCS मधील सर्वात बेसिक पद म्हणजे Assistant System Engineer. या पदावरील व्यक्तीची वार्षिक पगार ₹३.३६ ते ₹३.६० लाख असतो, तर इन-हँड पगार दरमहा सुमारे ₹२१,००० ते ₹२३,००० (PF आणि Professional Tax वजा केल्यानंतर) मिळतो. तसेच, BPS (Business Process Services) विभागासाठीचा पगार ₹१.८ लाख ते ₹२.५ लाख वार्षिक असतो.

मिड-लेव्हल सॅलरी (३-८ वर्षांचा अनुभव)

३ ते ८ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार साधारण: ₹६ लाख ते ₹१५ लाख वार्षिक पगार मिळतो. या स्तरावर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टम इंजिनिअर आणि बिझनेस अॅनालिस्ट ही पदे येतात.विशेष कौशल्ये (Cloud, Data Science, Cyber Security, AI) असल्यास पगार यापेक्षा जास्तही मिळू शकतो.

सीनियर लेव्हल सॅलरी (८-१५ वर्षांचा अनुभव)

वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांचे वेतन अधिक वेगाने वाढते. यांना ₹१५ लाख ते ₹३० लाख वार्षिक पगार मिळू शखतो. या स्तरावर प्रोजेक्ट मॅनेजर, टेक्निकल लीड आणि आर्किटेक्ट अशी पदे आहेत. तर, १५+ वर्षांचा अनुभव (टॉप मॅनेजमेंट) असलेल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक ₹४० लाख ते ₹१ कोटी मिळू शकतो. 

अतिरिक्त फायदे 

केवळ पगारच नाही, तर अनेक अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. यामध्ये हेल्थ इन्शुरन्स, PF, बोनस, ऑनसाइट (परदेशात काम) संधी, ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम.

CEO चा पगार

TCS चे CEO आणि MD के किर्तीवान यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमारे ₹२६.५२ कोटी वार्षिक पॅकेज मिळाले. यामध्ये बेसिक सॅलरी, भत्ते आणि कमिशनचा समावेश आहे. तर, TCS चे चेअरमन एन. चंद्रशेखरन हे Tata Sons चेही कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांचा एकूण वार्षिक पगार तब्बल ₹१५५.८१ कोटी आहे. यामध्ये फिक्स्ड सॅलरी व भत्ते ₹१५.१२ कोटी आणि नफ्यावर आधारित कमाई ₹१४०.६९ कोटी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : TCS Salaries: Freshers to CEOs, Know the Pay Structure

Web Summary : TCS employs over 6 lakh people globally. Freshers earn ₹3.3 to ₹7 lakh annually, while experienced staff (3-8 years) earn ₹6-15 lakh. Senior roles and CEO packages reach crores, plus benefits.
टॅग्स :माहिती तंत्रज्ञाननोकरीटाटा