Join us

Home sales: मार्च तिमाहीत घरांची विक्री वाढली नऊ टक्क्यांनी, मुंबई, पुण्यामध्ये मात्र झाली घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 06:30 IST

Home sales:

नवी दिल्ली : जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशातील घरांची विक्री ९ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील ८ मोठ्या शहरांमध्ये ७८,६२७ घरांची विक्री झाली, असे नाईट फ्रँक इंडियाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.असे असले तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील घरांची विक्री ९ टक्क्यांनी तर पुण्यातील विक्री २५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. 

मागील आठवड्यात ॲनारॉक आणि प्रॉपटायगर या संस्थांनी गृहनिर्माण क्षेत्रातील त्यांचा डेटा जाहीर केला होता. सात शहरांतील घरांची व्रिक्री ७१ टक्क्यांनी वाढून ९९,५५०वर गेल्याचे ॲनारॉकने म्हटले होते. प्रॉपटायगरने ८ मोठ्या शहरांतील वाढ ७ टक्के आणि घरांची विक्री ७०,६२३वर गेल्याचे म्हटले होते.

नाईट फ्रँकच्या अहवालानुसार, भारतातील महत्त्वाच्या ८ शहरांमध्ये २०२२च्या पहिल्या तिमाहीत ७८,६२७ घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ती ९ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा सलग तिसऱ्या तिमाहीत कोविडपूर्व काळातील घर विक्रीपेक्षा अधिक राहिला आहे.

महाराष्ट्रात सवलतीनंतरही कमी विक्रीदेशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २१,५४८ घरांची विक्री झाली. येथील वृद्धी मात्र वार्षिक आधारावर ९ टक्क्यांनी घसरली. पुण्यातील घरांची विक्रीही २५ टक्क्यांनी घसरली. येथे  १०,३०५ घरे विकली गेली. ही घसरण मोठी समजली जात आहे. कारण घरांची विक्री वाढावी, यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केलेली असतानाही घरांची विक्री घटली आहे. चेन्नईतही घर विक्री १७ टक्क्यांनी घसरून ३,३७६वर आली.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनव्यवसाय