American Share Market: अमेरिकन शेअर बाजारात वादळ येणार आहे का? खरंतर, एका एक्सपर्टनं यासंदर्भात इशारा दिला आहे. या एक्सपर्टचं नाव रे डालिओ आहे. डालिओ हे ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक आणि माजी सीईओ आहेत. डालिओ म्हणतात की अमेरिकन शेअर बाजाराला लवकरच 'हार्ट अटॅक' येऊ शकतो. याचा अर्थ, बाजारात मोठी घसरण होऊ शकते. त्यांनी याची तीन कारणे सांगितली आहेत. त्यांनी काही सल्लाही दिला आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डालिओ यांनी म्हटलंय की अमेरिकन शेअर बाजार लवकरच मोठी घसरण पाहू शकतो. यामागील एक कारण म्हणजे अमेरिकन शेअर बाजार त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. त्यांनी अमेरिकेवरील वाढत्या कर्जाचे दुसरं कारण सांगितलं. तिसऱ्या कारणात त्यांनी, सध्या जगात भू-राजकीय तणाव सुरू आहे. अमेरिकन शेअर बाजार देखील यापासून सुटणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
त्यांनी काय सल्ला दिला?
डालिओ यांनी गुंतवणूकदारांना इशारा देऊन सल्लाही दिला आहे. त्यांनी लोकांना त्यांच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी सोनं खरेदी करण्यास सांगितलंय. डालिओ यांच्या मते, गुंतवणूकदारांनी त्यांच्या संपत्तीच्या १० ते १५% सोन्यात खरेदी करावी. कठीण काळात सोनं ही सुरक्षित गुंतवणूक असू शकते असं त्यांचं मत आहे. सोनं गुंतवणूकदारांना कर्जबाजारी बाजारपेठेपासून वाचवू शकते, असंही ते म्हणाले.
अमेरिका अधिक खर्च करतोय
अबू धाबी फायनान्स वीकच्या एका कार्यक्रमात बोलताना डालिओ म्हणाले की अमेरिका आपले कर्ज फेडण्यासाठी जास्त खर्च करत आहे. यामुळे इतर महत्त्वाच्या खर्चासाठी पैसे कमी होतील. त्यांनी त्याची तुलना शरीराच्या नसांमध्ये जमा होणाऱ्या 'प्लाक'शी (एथेरोस्क्लेरोसिस) केली. ते म्हणाले की हे अमेरिकन बाजारासाठी हृदयविकाराच्या धोक्याच्या इशाऱ्यासारखं आहे. म्हणजेच जर लक्ष दिलं नाही तर अमेरिकन शेअर बाजाराला हृदयविकाराचा झटका येईल.
सोन्यात गुंतवणूक का करावी?
वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा १०% ते १५% दरम्यान असावा. सोनं इतर गोष्टींपेक्षा वेगळं आहे. जेव्हा इतर गोष्टींची किंमत कमी होते तेव्हा सोन्याची किंमत वाढते, असं डालियो यांचं म्हणणं आहे.