HDFC Bank Update : तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँक सिस्टम मेंटेनन्सच्या (System Maintenance) कामामुळे आपल्या काही सेवा बंद ठेवणार आहे. एकूण बँकिंग अनुभव सुधारता यावा, यासाठी हे मेंटेनन्स केले जात आहे.
बँकेच्या म्हणण्यानुसार, या मेंटेनन्स दरम्यान बँकेच्या काही सेवा बंद राहतील. म्हणजेच, तुम्ही त्या सेवांचा वापर करू शकणार नाही. यामध्ये व्हॉट्सॲप चॅट बँकिंग, एसएमएस बँकिंग, टोल फ्री बँकिंग आणि फोन बँकिंग IVR सारख्या सुविधांचा समावेश आहे. बँकेने मेंटेनन्ससाठी एक दिवस ठरवला असून, या दिवशी काही तासांसाठी या सेवा बंद राहणार आहेत.
या सेवा एकूण 16 तास बंद राहतील. बँकेच्या म्हणण्यानुसार, हे मेंटेनन्स 24 जानेवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून सुरू होईल आणि 25 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता पूर्ण होईल. अशा प्रकारे, या संपूर्ण कालावधीत अनेक बँकिंग सेवा प्रभावित होतील. बँकेने आपल्या ग्राहकांना महत्वाची कामे करुन घेण्यास सांगितले आहे. जेणेकरुन ऐनवेळी ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.