Join us

HDFC Bank Q1 Results : बँकेचा नफा वाढून ११,९५१ कोटी रुपयांवर, एक्सपर्ट म्हणाले, "शेअर १७०० पर्यंत जाणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:03 IST

देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेनं तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकेनं तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेला एप्रिल-जून दरम्यान ११९५० कोटी रुपयांचा स्टँडअलोन नफा झाला आहे. दरम्यान, बँकेला ११५८० कोटी रुपयांचा नफा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर दुसरीकडे व्याजातून कमाई NII देखील वाढून २३५९९ कोटी रुपये झालाय. वर्षभरापूर्वी पहिल्या तिमाहित तो १९,४८२ कोटी रुपये होता. निकालानंतर एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्येही वाढ झाली आहे.

जून तिमाहित एनपीए वाढलादरम्यान, अडकलेल्या कर्जाचा एनपीए वाढला असल्याचंही कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलंय. तिमाही आधारावर ग्रॉस एनपीए १.१२ टक्क्यांनी वाढून १.१७ टक्के झालाय. यासोबतच नटे एनपीएदेखील ०.२७ टक्क्यांवरुन वाढून ०.३० टक्के झालाय. बीएसईवर एचडीएफसी बँकेचा शेअर वाढून १६७५ रुपयांवर ट्रेड करत होता. 

उत्पन्न वाढलंतिमाहीदरम्यान बँकेचं एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर ३९ टक्क्यांनी वाढून ५७,८१७ कोटी रूपये झाले आहे. नेट इंटरेस्ट इन्कम वार्षिक आधारावर २१ टक्क्यांनी वाढून २३,८१७ कोटी रूपये झालेय. पॅरेंट कंपनी एचडीएफसी लिमिटेडच्या विलिनीकरणानंतर पहिल्यांदा बँकेनं तिमाही निकालांची घोषणा केली आहे. 

काय म्हणतायत तज्ज्ञ?चार्ट स्ट्रक्चर अतिशय उत्तम आहे. करेक्शननंतर शेअर सपोर्टच्या अतिशय नजीक ट्रेड करत आहे. शेअरनं जेव्हा १६२५ रुपयांची सपोर्ट लेव्हल तोडली तोच प्राईजराईज निगेटिव्ह फॅक्टर इन झाली आहे. आता शेअरमध्ये पुलबॅक पाहायला मिळू शकतं. अशातच शेअर १७०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता 5Paisa चे रुचित जैन यांनी व्यक्त केली.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एचडीएफसी