Join us  

महिला उद्योजकांना व्यवसाय वृद्धिसाठी HDFC Bank करणार सहाय्य; स्मार्टअप उन्नती प्रोग्राम लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 9:56 PM

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खासगी क्षेत्रातील आघाडीच्या HDFC Bank ने महिला उद्योजकांसाठी विशेष स्मार्टअप उन्नती प्रोग्राम लाँच केला आहे.

ठळक मुद्देHDFC Bank कडून स्मार्टअप उन्नती प्रोग्राम लाँचमहिला उद्योजकांसाठी बँकेचा विशेष कार्यक्रमस्मिता भगत यांनी सांगितला कार्यक्रमाचा उद्देश

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खासगी क्षेत्रातील आघाडीच्या HDFC Bank ने महिला उद्योजकांसाठी विशेष स्मार्टअप उन्नती प्रोग्राम लाँच केला आहे. महिलांसाठी तयार केलेल्या या खास कार्यक्रमाचा लाभ केवळ विद्यमान महिला ग्राहकांसाठी असेल, असे एचडीएफसी बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (hdfc bank launched smartup unnati program will help to grow women entrepreneurs business)

स्मार्टअप उन्नती कार्यक्रमाअंतर्गत एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ महिला अधिकारी महिला उद्योजकांना वर्षभर सल्लामसलत करून त्यांच्या व्यवसायातील लक्ष्ये साध्य करण्यास मदत करणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या शासकीय आणि संस्थात्मक व्यवसाय, ई-कॉमर्स आणि स्टार्टअप बँकिंगच्या प्रमुख स्मिता भगत यांनी याविषयी बोलताना सांगितले की, स्मार्टअप अपग्रेडेशन प्रोग्रामचा एक भाग म्हणून एचडीएफसी स्मार्टअप प्रोग्रामशी संबंधित तीन हजारांहून अधिक महिला उद्योजकांना सल्लामसलत करणार आहे. 

आमचा रोजगार धोक्यात, मार्ग काढा; Big Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांचे PM मोदींना साकडे

महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने काम

महिलांना समान संधी उपलब्ध करून देण्यात आमचा विश्वास आहे. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही बर्‍याच वर्षांपासून सातत्याने काम करीत आहोत. उद्योजकांना स्टार्टअप सुरू करून यशस्वी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असे स्मिता भगत यांनी सांगितले. एचडीएफसी बँकेच्या स्मार्टअप अपग्रेडेशन प्रोग्रामअंतर्गत वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अनुभवातून महिला उद्योजकांना निश्चितच मोठा फायदा होईल. यामुळे त्यांचा दृष्टिकोन वाढेल आणि योग्य वेळी चांगल्या सल्ल्याद्वारे त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत होईल, असा विश्वास भगत यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, हा कार्यक्रम संपूर्णपणे महिला आणि महिलांसाठीच आहे. बँक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्य सरकारांशी एकत्र काम करीत आहे. सन २०१८ मध्ये एचडीएफसी बँकेने आपल्या स्मार्टअप प्रोग्राम अंतर्गत बँकिंग स्टार्टअपसाठी एक ऑनलाईन मार्गदर्शक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. 

टॅग्स :एचडीएफसी