Join us

HDFC बँकेने ग्राहकांना पुन्हा दिला झटका, आजपासून 'या' कामासाठी मोजावे लागतील जास्त पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 16:31 IST

बँकेने एमसीएलआर दर 0.05 टक्क्यांवरून 0.15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्हीही एचडीएफसी (HDFC) बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. बँकेने एमसीएलआर दर 0.05 टक्क्यांवरून 0.15 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवीन दर 8 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

एमसीएलआर दर वाढल्याने थेट गृहकर्ज आणि कार कर्जाच्या ईएमआयवर परिणाम होईल. यामुळे भविष्यात तुम्ही कर्ज घेतल्यास, तुम्हाला हप्त्याच्या स्वरूपात (EMI) जास्त पैसे द्यावे लागतील. HDFC बँकेच्या मते, एका दिवसासाठी एमसीएलआर दर 7.95 टक्के वर गेला आहे. तसेच, हा दर एका महिन्यासाठी 8.10 टक्के आणि तीन महिन्यांसाठी 8.40 टक्के असणार आहे. सहा महिन्यांसाठी एमसीएलआर दर 8.80 टक्के आहे.

याचप्रमाणे एमसीएलआर एका वर्षासाठी 9.05 टक्के आणि दोन वर्षांसाठी 9.10 टक्के आहे. एमसीएलआर दर तीन वर्षांसाठी 9.20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एमसीएलआर वाढवण्याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला बँकेकडून मिळणारे कर्ज महाग होईल. जर तुम्ही आधीच गृहकर्जाचे हप्ते भरत असाल तर यामुळे तुमचा ईएमआय वाढेल आणि तुम्ही कार लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल. 

बँकेने केलेली ही वाढ फ्लोटिंग व्याजदरावर लागू आहे. त्याचा निश्चित व्याजदरावर कोणताही परिणाम होत नाही. एमसीएलआर हा किमान व्याजदर आहे, ज्याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देत नाही.

टॅग्स :एचडीएफसीव्यवसाय