Join us

HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:10 IST

एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओबाबत एक अपडेट आली आहे. पाहा कधी येणार आहे आयपीओ आणि किती करावी लागणार गुंतवणूक.

एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओबाबत एक अपडेट आली आहे. कंपनीने या आयपीओसाठी १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअरमागे ७०० ते ७४० रुपये असा प्राइस बँड निश्चित केलाय. गुंतवणूकदारांना २५ जूनपासून या आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे. यामध्ये २७ जून पर्यंत बोली लावता येईल. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदारांना वाटप २४ जून रोजी होणारे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये २० शेअर्स असतील.

अधिक माहिती काय?

वृत्तानुसार, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओमधये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सना (क्यूआ५०% पेक्षा जास्त शेअर्स राखीव ठेवले नाहीत, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी (एनआयआय) १५% आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑफरच्या ३५% शेअर्स राखीव ठेवण्यात आलेत. या शेअर्सचं वाटप ३० जून रोजी केलं जाईल आणि ज्यांना शेअर्स मिळणार नाहीत त्यांना १ जुलैपासून पैसे परत करण्यात येतील. परताव्यानंतर त्याच दिवशी शेअर्स अलॉटीजच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर्स बुधवार, २ जुलै रोजी बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होण्याची शक्यता आहे.

हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

कामगिरी कशी?

डेटानुसार, HDB फायनान्शियल सर्व्हिसेसने ३१ मार्च २०२५ पर्यंत एकूण १,०६८.८ अब्ज रुपयांच्या कर्जाची नोंद केली. हे ३१ मार्च २०२३ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत २३.५४% चा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) दर्शवतें त्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३१ मार्च २०२५ पर्यंत १,०७२.६ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत, जे आर्थिक वर्ष २०२३ ते आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत २३.७१% च्या CAGR दर्शवतात. एनबीएफसीनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ₹२१.८ अब्ज रुपयांचा करोत्तर नफा (PAT) मिळवला.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक