Join us

तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:42 IST

PAN Card Loan Check: तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट कर्ज घेतल्याचा तुम्हाला संशय आहे का? आजच्या डिजिटल युगात बनावट कर्जांची समस्या वाढत आहे. अनेक सायबर गुन्हेगार तुमच्या माहितीचा गैरवापर कर्ज घेण्यासारखे आर्थिक व्यवहार करण्यासाठी करतात.

PAN Card Loan Check: तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून बनावट कर्ज घेतल्याचा तुम्हाला संशय आहे का? आजच्या डिजिटल युगात बनावट कर्जांची समस्या वाढत आहे. अनेक सायबर गुन्हेगार तुमच्या माहितीचा गैरवापर कर्ज घेण्यासारखे आर्थिक व्यवहार करण्यासाठी करतात, ज्यामुळे भविष्यात तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या नावावर कोणी बनावट कर्ज घेतलं आहे हे घरी बसून जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे पॅन कार्डाच्या मदतीनं जाणून घेऊ शकता. तसंच तुम्ही भविष्यातील आर्थिक समस्यांपासून सुरक्षित राहू शकाल.

पॅन कार्डद्वारे बनावट कर्ज कसं पाहाल?

तुमच्या नावावर घेतलेल्या कर्जाची माहिती तुम्ही तुमच्या पॅन कार्डच्या माध्यमातून सहज जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या प्रक्रियांचं पालन करावं लागेल.

शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

क्रेडिट ब्युरो वेबसाइट

बनावट कर्जांबद्दल माहिती मिळविण्यासाठी, क्रेडिट ब्युरोची (CIBIL) अधिकृत वेबसाइट www.cibil.com किंवा इतर कोणत्याही क्रेडिट ब्युरोची अधिकृत वेबसाइट पाहा.

- आता तुम्हाला Get Your CIBIL Score चा पर्याय मिळेल.

- आता तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी तपशील भरावे लागतील.

- आता नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीद्वारे लॉगिन करा.

- लॉग इन केल्यानंतर, कर्ज आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व माहिती तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसेल.

बनावट कर्ज दिसलं तर?

चौकशीनंतर जर तुमच्या नावावर बनावट कर्जे किंवा संशयास्पद व्यवहारांसारखी कोणतीही माहिती आढळली तर ताबडतोब खाली दिलेली पावलं उचला.

१. सर्वप्रथम तुमच्या बँकेला किंवा कर्ज देणाऱ्या कंपनीला याबद्दल कळवा. ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेकडे लेखी तक्रार दाखल करा आणि सांगा की हे कर्ज तुम्ही घेतलेले नाही.

२. बँकेव्यतिरिक्त, CIBIL, Experian किंवा Equifax सारख्या क्रेडिट ब्युरोकडे लेखी तक्रार करा. यासोबतच, तुम्हाला ओळखीचा पुरावा, कर्जाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र यासारखे तपशील सादर करावे लागतील.

३. याशिवाय, तुम्हाला तुमच्या जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये तक्रार दाखल करावी लागेल. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही www.cyberprime.gov.in या ऑनलाइन पोर्टलद्वारे देखील तक्रार नोंदवू शकता.

४. तुमचं पॅन कार्ड किंवा इतर आर्थिक माहिती कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल तर ताबडतोब आयकर विभागाला कळवा आणि नवीन पॅन कार्ड बनवून घ्या.

टॅग्स :पॅन कार्डपैसा