Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल बंद, कुटुंबालाही भेटू देत नाही! अर्थमंत्रालयाचे अधिकारी १०० अधिकारी 'नजरकैदेत'; काय आहे परंपरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 11:59 IST

Halwa Ceremony 2026 : दरवर्षीप्रमाणे, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करतील. अर्थसंकल्पापूर्वी आयोजित केलेला हलवा समारंभ ही एक जुनी परंपरा आहे, जिथे नॉर्थ ब्लॉकमधील एका मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो.

Halwa Ceremony 2026 : १ फेब्रुवारी रोजी मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थमंत्रालयात 'हलवा सोहळा' पार पडला. हा केवळ एक गोड पदार्थ खाण्याचा कार्यक्रम नसून, तो देशाच्या अर्थसंकल्पाच्या छपाईचा आणि सर्वात कडक 'गोपनीयतेचा' प्रारंभ मानला जातो. या सोहळ्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे 'शिलेदार' आता बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त होऊन 'लॉक-इन' कालावधीत गेले आहेत.

काय आहे 'हलवा सेरेमनी'?अर्थमंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात एका मोठ्या कढईत हलवा तयार केला जातो. अर्थमंत्री स्वतः या प्रसंगी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना हलवा वाटतात. ही परंपरा सुचवते की, बजेटमधील सर्व महत्त्वाचे निर्णय, आकडेवारी आणि प्रस्ताव आता 'फायनल' झाले आहेत. गोड पदार्थाने कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात करण्याची भारतीय संस्कृती या परंपरेतून जपली जाते.

'लॉक-इन' पिरीयड : जगापासून पूर्ण संपर्क तुटणार!हलवा सोहळा संपताच बजेट प्रक्रियेत सामील असलेले सुमारे १०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी 'लॉक-इन' पिरीयडमध्ये जातात. याचे नियम अत्यंत कडक आहेत. हे अधिकारी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॉकच्या इमारतीबाहेर पडू शकत नाहीत. त्यांना आपल्या कुटुंबाशी भेटण्याची किंवा फोनवर बोलण्याची परवानगी नसते. त्यांचे मोबाईल फोन जप्त केले जातात. संपूर्ण छपाई कक्षात इंटरनेट आणि संपर्काची सर्व साधने ब्लॉक केली जातात. केवळ आपत्कालीन स्थितीतच अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत कुटुंबाशी संवाद साधता येतो.

गोपनीयतेची गरज का?बजेटमध्ये प्राप्तिकरातील बदल, सबसिडी, आणि विविध क्षेत्रांसाठीच्या मोठ्या घोषणा असतात. जर ही माहिती आधीच लीक झाली, तर,

  • शेअर बाजारात फेरफार : काही लोक आधीच माहिती मिळवून अवाजवी फायदा घेऊ शकतात.
  • आर्थिक अस्थिरता : चुकीच्या अफवा पसरल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
  • पारदर्शकता : सर्व नागरिकांना आणि गुंतवणूकदारांना एकाच वेळी अधिकृत माहिती मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश असतो.

वाचा - वीज ग्राहकांना दरवाढीचा 'शॉक'! आता दरवर्षी वाढणार वीज बिल; अधिवेशनात विधेयक येण्याची शक्यता

१९५० ची 'ती' घटना आणि कडक नियमहे कडक नियम अचानक बनलेले नाहीत. १९५० मध्ये भारताचा अर्थसंकल्प छापताना लीक झाला होता. या वादामुळे तत्कालीन अर्थमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनातून नॉर्थ ब्लॉकच्या हाय-टेक प्रेसमध्ये हलवण्यात आली आणि गोपनीयतेचे हे कडक नियम लागू करण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Budget Secrecy: Indian Finance Ministry Officials Under Lockdown Before Budget.

Web Summary : Ahead of the budget, India's Finance Ministry conducts the 'Halwa Ceremony,' marking budget document printing and strict secrecy. Over 100 officials enter 'lock-in,' cut off from the outside world to prevent leaks, a practice established after a 1950 budget leak.
टॅग्स :बजेट माहितीकेंद्रीय अर्थसंकल्प 2026अर्थसंकल्प २०२६निर्मला सीतारामन