इराणसोबतच्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेत परवडणाऱ्या घरांचं संकट अधिक गडद होत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, ४९% अमेरिकन नागरिकांना त्यांचं नियमित घरभाडं किंवा घराचे हप्ते भरणं शक्य होत नाहीये. एका सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात हा आकडा ४४% होता, म्हणजेच एका वर्षापेक्षा कमी कालावधीत यात ५% वाढ झाली आहे. घरभाडं आणि कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे वाचवण्यासाठी लोकांना आपल्या जेवणात कपात करावी लागत आहे, सुट्ट्या रद्द कराव्या लागत आहेत आणि वैद्यकीय उपचारही पुढे ढकलावे लागत आहेत.
'रेडफिन'च्या सर्वेक्षणानुसार, 'जेन जी' (Gen Z) म्हणजेच नव्या पिढीतील ६७% लोकांसाठी घराचा खर्च पेलणं कठीण होत आहे. 'जेन एक्स' (Gen X) च्या बाबतीत हे प्रमाण ५३% आणि 'बेबी बुमर्स'च्या बाबतीत ३६% आहे. १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्यांना 'जेन झी', १९६५ ते १९८० दरम्यान जन्मलेल्यांना 'जेन एक्स' आणि १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेल्या पिढीला 'बेबी बुमर' म्हटलं जातं.
सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर
'जेन झी' हवालदिल
'जेन झी' पिढीतील तरुणांना आपला खर्च भागवण्यासाठी स्वतःच्या वस्तू विकाव्या लागत आहेत, तर अनेक तरुण पैसे वाचवण्यासाठी पुन्हा आपल्या पालकांच्या घरी राहायला जात आहेत. अमेरिकेत एक सामान्य घर परवडण्यासाठी वार्षिक १,११,००० डॉलर उत्पन्नाची गरज आहे, जे देशातील प्रत्येक कुटुंबाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा २५,००० डॉलरनं जास्त आहे. अमेरिकेच्या इतिहासात गृहनिर्माण क्षेत्र कधीही इतकं महागडं नव्हतं.
याच दरम्यान, अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता सतत वाढत आहे. पुढील १२ महिन्यांत मंदी येण्याची शक्यता फेब्रुवारीमध्ये ४८.६% पर्यंत पोहोचली आहे, जी २०२० च्या महासाथीनंतरची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या सहा महिन्यांत या शक्यतेत १५% वाढ झाली आहे. 'मूडीज'च्या आर्थिक निर्देशकांवर आधारित हा अंदाज व्यापक आर्थिक डेटा आणि मशीन लर्निंग मॉडेल्सचा वापर करून वर्तवण्यात आलाय.
कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास, मंदी नसताना अशा प्रकारची उच्च शक्यता कधीही दिसून आली नव्हती. जॉब मार्केटची स्थिती खालावल्यामुळे मंदीची भीती वाढली आहे. मार्चमध्ये ही शक्यता ५०% च्या पुढे जाण्याची भीती आहे, कारण इराण युद्धा मुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालीये. दुसऱ्या महायुद्धानंतरची आकडेवारी पाहिल्यास, कोरोना महासाथीचा काळ वगळता प्रत्येक वेळी मंदीपूर्वी तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
अमेरिकेत तेल आणि गॅसच्या किमतीत अलीकडे प्रचंड वाढ झाली. मंगळवारी देशात पेट्रोलची किंमत प्रति गॅलन $३.७२ वर पोहोचली, जी ७ ऑक्टोबर २०२३ नंतरची सर्वोच्च पातळी आहे. २८ फेब्रुवारीला इराणसोबत युद्ध सुरू झाल्यापासून पेट्रोलच्या किमतीत प्रति गॅलन ७४ सेंट्सची वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात किमतीत २६.९% वाढ झाली असून, 'कॅटरीना' चक्रीवादळानंतर एका महिन्यात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे.
Web Summary : Soaring housing costs in America leave nearly half unable to afford rent. Gen Z faces the biggest burden. Recession risk rises amid high oil prices and economic uncertainty.
Web Summary : अमेरिका में आवास की बढ़ती लागत के कारण लगभग आधे लोग किराया भरने में असमर्थ हैं। जेन जेड सबसे बड़ी चुनौती का सामना कर रहा है। उच्च तेल की कीमतों और आर्थिक अनिश्चितता के बीच मंदी का खतरा बढ़ रहा है।