Join us
Daily Top 2Weekly Top 5

अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:58 IST

आता ३ दशकांनी ही गुंतवणूक इतकी वाढली की या शेअर्सची किंमत ८० कोटी इतकी झाली आहे.

एखाद्याच्या नशिबाचे दरवाजे कधी उघडतील हे सांगता येत नाही. शेअर बाजारातगुंतवणूक भलेही जोखमीची असली तरी दीर्घ काळ मिळणारा परतावा गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा सौदा होतो. असेच एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे जेव्हा एका व्यक्तीच्या घरात अचानक १९९५ साली खरेदी केलेले शेअर्स सर्टिफिकेट सापडले. या व्यक्तीच्या वडिलांनी JSW शेअर्स खरेदी केले होते त्याचेच हे डॉक्युमेंट्स होते. ज्यात त्याच्या वडिलांनी १ लाखाची गुंतवणूक केली होती. ज्याची किंमत आता ८० कोटी झाली आहे. त्यामुळे एका झटक्यात हा व्यक्ती कोट्यधीश बनला. सध्या हा विषय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

३० वर्षापूर्वी खरेदी केले होते शेअर्स

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, एका रेडिट यूजरला अचानक कोट्यवधीची मालमत्ता हाती लागली आहे जेव्हा त्याला घरात वडिलांनी ३० वर्षापूर्वी खरेदी केलेल्या जेएसडब्ल्यू स्टील शेअर्स सर्टिफिकेट मिळाले. जेएसडब्ल्यू शेअरची खरेदी संबंधित व्यक्तीच्या वडिलांनी ९० च्या दशकात केली होती. त्यावेळी १ लाखाची गुंतवणूक केली आणि ते विसरून गेले. आता ३ दशकांनी ही गुंतवणूक इतकी वाढली की या शेअर्सची किंमत ८० कोटी इतकी झाली आहे.

शेअर बाजार गुंतवणूकदार सौरव दत्ता यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवर ही पोस्ट आणि फोटो शेअर केला आहे. सध्या ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. एका युजरने दीर्घकाळ गुंतवणुकीच्या फायद्यावर फोकस करत म्हटलं की, चांगला बिझनेस विकण्यास घाई करू नका. जर पाया मजबूत असेल तर वेळेला त्याचे काम करू द्या. JSW Share शी निगडित ही गुंतवणूक त्याची ताकद दाखवून देते. आता हा व्यक्ती निवृत्ती घेऊन शांतीने त्याचे आयुष्य जगू शकतो अशा विविध कमेंट्स येत आहेत. 

जेएसडब्ल्यू स्टील शेअर्सच्या दराबाबत बोलायचे झाले तर सध्या ही २.४७ लाख कोटींची कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरचा भाव सोमवारी १००९.५० रुपये इतका होता. दीर्घकाळ गुंतवणूकदारांना या शेअरने खूप फायदा दिला. जर २० वर्षाची आकडेवारी पाहिली तर गुंतवणूकदारांना २४८४.३४ टक्के रिटर्न मिळाला आहे. मागील ५ वर्षात या शेअरच्या किंमतीत ४३३.६९ टक्के फायदा झाला आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक