Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरनाेंदणी रद्द केल्यास जीएसटी मिळणार परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 12:01 IST

करार रद्द झाल्यानंतर दाेन वर्षांपर्यंत जीएसटी परताव्यासाठी अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : घराचे बुकिंग किंवा विमा पाॅलिसी रद्द केल्यास ग्राहकांना जीएसटी परतावा मिळणार आहे. या वस्तूंवर जीएसटी आकारण्यात येताे, ताे ग्राहकांना परत मिळेल. त्यासाठी ग्राहकांना जीएसटी पाेर्टलवर आपला पॅन वापरून तात्पुरती नाेंदणी करावी लागेल. करार रद्द झाल्यानंतर दाेन वर्षांपर्यंत जीएसटी परताव्यासाठी अर्ज करू शकतात.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनव्यवसाय