Join us

GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 23:24 IST

GST Council Meet Results: आता जवळपास ९० टक्के वस्तू या ५ आणि १८ टक्के जीएसटीमध्ये आल्या आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून अनेक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होत आहेत.

केंद्र सरकारने दिवाळीपूर्वीच जीएसटीमध्ये मोठी सुधारणा केली आहे. १२ आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केला आहे. आता जवळपास ९० टक्के वस्तू या ५ आणि १८ टक्के जीएसटीमध्ये आल्या आहेत. एवढेच नाही तर अनेक दैनंदिन खाद्यपदार्थ आणि विम्यासह ३३ जीवरक्षक औषधे जीएसटी मुक्त करण्यात आली आहेत. 

GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...

येत्या २२ सप्टेंबरपासून अनेक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होत आहेत. बटर, तूप, चीज, डेअरी स्प्रेड, पॅक केलेले नमकीन, भुजिया, भांडी, मुलांच्या आहाराच्या बाटल्या आणि नॅपकिन्स, क्लिनिकल डायपर आणि शिलाई मशीनवरील कर देखील १२% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.

आरोग्यासाठी काय...थर्मामीटर, ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट, ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स आणि ग्लासेसवरील कर ५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. तसेच आरोग्य आणि जीवन विम्यावरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. ३३ जीवनरक्षक औषधांवरील जो १२ टक्के कर आकारला जात होता तो देखील आता शून्य करण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांनाही दिलासा...नकाशे, चार्ट, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, नोटबुक आणि खोडरबर आदींवर शून्य जीएसटी करण्यात आला आहे. 

टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामनआरोग्य