Join us

GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:41 IST

GST On Bikes and Scooters: जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे रोजच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या बाइक्स स्वस्त झाल्या आहेत. पण, महागड्या बाइक्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

GST On Bikes and Scooters: जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे रोजच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या बाइक्स स्वस्त झाल्या आहेत. पण, महागड्या बाइक्सच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. २२ सप्टेंबरपासून दुचाकींवरील कर दर बदलले आहेत. इंजिनच्या आकार आणि इंधनाच्या प्रकारानुसार कर आकारला जाईल. यामुळे कोणती बाइक खरेदी करणं फायदेशीर आहे हे कळेल. ३५० सीसीपेक्षा कमी इंजिन असलेल्या बाइक्सवर आता फक्त १८% जीएसटी लागेल, जो पूर्वी २८% होता. सामान्य खरेदीदारांना याचा फायदा होईल. पण, ३५० सीसीपेक्षा जास्त असलेल्या महागड्या बाइक्सवर आता ४०% जीएसटी लागेल, जो पूर्वी ३१% होता. इलेक्ट्रिक बाइक्सवर फक्त ५% जीएसटी लागेल. या बदलामुळे काही बाइक्स स्वस्त होतील तर काही महाग होतील.

नवीन जीएसटी प्रणालीचा सामान्य माणसाला फायदा होईल. ३५० सीसी पेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईकवरील कर कमी करण्यात आला आहे. आता त्यावर फक्त १८% जीएसटी आकारला जाईल. पूर्वी तो २८% होता. याचा अर्थ असा की जर तुम्ही हिरो स्प्लेंडर, होंडा शाइन किंवा टीव्हीएस अपाचे, बजाज पल्सर आणि रॉयल एनफील्डच्या हंटर, बुलेट, क्लासिक ३५०, मेटिओर ३५० वर लाख रुपयांवर तुम्ही १०,०००-१२,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता.

कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

किती बचत होईल?

एका डीलरने सांगितलं की, 'ऑफिसला जाणाऱ्या आणि शहरातील बाईक रायडर्ससाठी ही चांगली बातमी आहे.' याचा अर्थ असा की होंडा अॅक्टिव्हा १२५ आणि टीव्हीएस ज्युपिटर सारख्या स्कूटर स्वस्त होतील. या स्कूटर भारतात खूप लोकप्रिय आहेत. लॉजिस्टिक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या तीन चाकी वाहनांनाही आता कमी कर आकारणी लागू होईल. याचा फायदा डिलिव्हरी पर्सन आणि कमर्शियल वाहन चालकांना होईल.

परंतु ही सवलत फक्त कम्युटर बाइक्सपुरती मर्यादित आहे. ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या महागड्या बाइक्सवर आता जास्त कर आकारला जाईल. रॉयल एनफील्ड हिमालयन ४५०, केटीएम ड्यूक ३९० आणि ट्रायम्फ स्पीड ४०० सारख्या बाइक्स आता ४०% जीएसटीच्या कक्षेत येतील. पूर्वी यावर ३१% कर आकारला जात होता.

इलेक्ट्रिक बाइक्समध्ये कोणताही बदल नाही

इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर्समध्ये कोणताही बदल नाही. त्यांच्यावर अजूनही ५% जीएसटी आहे. ओला इलेक्ट्रिक, एथर, टीव्हीएस आयक्यूब आणि बजाज चेतक इलेक्ट्रिक सारख्या इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर्स अजूनही सर्वात कमी कराच्या कक्षेत आहेत. इलेक्ट्रिक वाहनं चालवण्यास स्वस्त असतात आणि त्यामुळे प्रदूषणही कमी होते. म्हणूनच, ज्यांना पैसे वाचवायचे आहेत आणि पर्यावरणाचा विचार करायचा आहे त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक वाहने हा सर्वोत्तम पर्याय आहे.

टॅग्स :जीएसटीपैसा